आठवडा बाजारात सापडलेले ११ हजार केले परत ; मिठाई विक्रेते हनुमंत माळी यांचा प्रामाणिकपणा!

नरखेड ता मोहोळ येथील आठवडा बाजार दर सोमवारी मोठ्या प्रमाणावर भरत असतो. नरखेड हे या भागातील २०-२५ गावाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने हजारोच्या संख्येने बाजारकरू नागरिक येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. सोमवारी बाजार भरल्यानंतर नरखेड येथील सुरेश दांडगे हे बाजार करण्यासाठी बाजारात गेले असता गॅस विक्री व दुरुस्ती करून गोळा झालेले पैसे त्यांच्या खिशातच होते. मात्र बाजार करीत असताना कळमण ता उत्तर सोलापूर येथील मिठाई व खाऊ विक्री करीत असलेले हनुमंत नागनाथ माळी यांच्या दुकानासमोर पडलेले त्यांच्या निदर्शनास आले.

    मोहोळ :  तालुक्यातील नरखेड येथील आठवडा बाजारात बाजार करीत असताना सुरेश दांडगे यांचे ११ हजार रुपये हरविले होते. मात्र ते पैसे दर आठवडी बाजारात खाऊ व मिठाई विक्रीसाठी येणारे कळमण ता उत्तर सोलापुर येथील हनुमंत नागनाथ माळी यांना सापडले असता त्यांनी चौकशी करून नरखेड औट पोस्ट पोलीस चौकीत आणून संबधीत अधिकाऱ्याच्या उपस्थितीत प्रामाणिकपणा दाखवित परत केले. माळी यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल ग्रामस्थांमधून अभिनंदन होत असून सत्कार करण्यात आला.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, नरखेड ता मोहोळ येथील आठवडा बाजार दर सोमवारी मोठ्या प्रमाणावर भरत असतो. नरखेड हे या भागातील २०-२५ गावाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने हजारोच्या संख्येने बाजारकरू नागरिक येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. सोमवारी बाजार भरल्यानंतर नरखेड येथील सुरेश दांडगे हे बाजार करण्यासाठी बाजारात गेले असता गॅस विक्री व दुरुस्ती करून गोळा झालेले पैसे त्यांच्या खिशातच होते. मात्र बाजार करीत असताना कळमण ता उत्तर सोलापूर येथील मिठाई व खाऊ विक्री करीत असलेले हनुमंत नागनाथ माळी यांच्या दुकानासमोर पडलेले त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ते पैसे घेऊन चौकशी केली तर ते पैसे सुरेश दांडगे यांचे असल्याचे समजल्यानंतर माळी यांनी नरखेड पोलीस औट पोस्ट मध्ये येऊन पोलीस कर्मचारी गणेश पोपळे व सत्यवान जाधव यांच्या समोर ते एक दोन नव्हे तर तबबल ११ हजार रुपये जसे होते तसे परत देऊन आजच्या काळातही आणखी प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे उदाहरण माळी यांनी समाजाला दाखवून दिला. माळी यांच्या या प्रमाणिकपणाबद्दल पोलीस कर्मचारी गणेश पोपळे, सरपंच बाळासाहेब मोटे यांच्या हस्ते हार1 घालून पेढा भरवून सत्कार करण्यात आला.
    यावेळी सुरेश दांडगे, पोलीस कर्मचारी सत्यवान जाधव, मनोज पाटील,युवा सेना उपजिल्हाप्रमुख लखन शिंदे, सुनील मोटे, तात्या मोटे, रावसाहेब नरळे,राहुल कसबे,सागर लांबरुड,मधुकर मोटे, बाबा रजपूत यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.