वाघापुर येथे माझे गाव माझी जबाबदारी या संकल्पनेतुन ३० बेडचे आयसोलेशन कक्ष, कोविड सेंटर उभारणर: सौरभ कुंजीर

प्रत्येकाने तोंडाला मास्क लावावा, सोशल डिस्टन्स पाळावे, आपण सर्वजन मिळून १००% कोरोनावर मात करून कोरोना मुक्त वाघापुर बनवूयात. सुरक्षित रहा, काळजी घ्यावी, असे आवाहन पुरंदर पंचायत समितीच्या माजी सभापती गौरी कुंजीर यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष पुष्कराज जाधव, कै. एकनाथ काका प्रतिष्ठानचे संतोष जगताप, राष्ट्रवादीचे विर भिवडी गटाचे अध्यक्ष महेश राऊत, दिपक जावळे, सुमित लवांडे, सुजित जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.

    माळशिरस: वाघापूर (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांनी एकत्र येऊन कोरोनाच्या परिस्थिती मध्ये प्रशासनाला सहकार्य म्हणून वाघापुर येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र शाळेत ३० बेड चे आयसोलेशन कक्ष, कोव्हीड केअर सेंटर उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून येत्या एक-दोन दिवसांमध्ये हे आयसोलेशन सेंटर सुरू होणार आहे. सामाजिक बांधिलकीतून हे सेंटर सुरु करीत आहोत, तर प्रत्येक गावात अशा पद्धतीने सेंटर सेंटर सुरू होण्याची गरज आहे असे वाघापूर चे उपसरपंच सौरभ कुंजीर यांनी सांगितले.

    खासदार सुप्रिया सुळे यांचे स्विय सहाय्यक मयुर जगताप यांनी नुकतीच वाघापूर येथील आयसोलेशन सेंटरला भेट दिली. आयसोलेशन सेंटर साठी लागणारी मदत ही खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून पोचविण्यासाठी मी प्रयत्न करेन व यासंदर्भात ताईंशी चर्चा करण्यात येईल ,असे जगताप यांनी सांगितले.या आयसोलेशन सेंटर साठी पुरंदर हवेली चे आमदार संजय जगताप यांची देखील मदत होणार आसल्याचे सरपंच रेवती कुंजीर यांनी सांगितले.

    कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत चालेला आहे. कोडीत येथे कोवीडचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालेले आहेत. ज्या रुग्णांना होम आयसोलेशन ची सुविधा उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी या सेंटरची मदत होईल. दवाखान्यात जर पेशंट आपण घेऊन गेलो तर बेड मिळत नाहीत, व्हेंटिलेटर मिळत नाहीत आणि दवाखान्याचा खर्च सर्वसामान्यांना न परवडणारे आहेत, म्हणून आपण वाघापुर येथील गावातील रुग्णांसाठी सुसज्ज असा गावच्या शाळेत विलगीकरण कक्ष उभा केला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत वाघापुर येथील तरुण वर्ग आणि नोकरीसाठी व्यवसायासाठी गावाबाहेर आसणाऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. गावातील पेशंट गावातच बरा झाला पाहिजे,त्यांच्यासाठी आपण ३० बेडची व्यवस्था केली आहे. सरकारी आरोग्य केंद्रातून औषधोपचार, ताप चेक करण्यासाठी टेंपरेचर गन, ऑक्सिजन पातळी चेक करण्यासाठी ऑक्सी मीटर, गरम पाण्याची वाफ घेण्यासाठी स्टीमर ,आंघोळीसाठी गरम पाणी ,लाईट ची व्यवस्था, फँनची व्यवस्था, सकाळी नाष्टा , अंडी, पाणी बॉटल्स, अशा विविध सुविधा उपलब्ध करणार आहोत.

    प्रत्येकाने तोंडाला मास्क लावावा, सोशल डिस्टन्स पाळावे, आपण सर्वजन मिळून १००% कोरोनावर मात करून कोरोना मुक्त वाघापुर बनवूयात. सुरक्षित रहा, काळजी घ्यावी, असे आवाहन पुरंदर पंचायत समितीच्या माजी सभापती गौरी कुंजीर यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष पुष्कराज जाधव, कै. एकनाथ काका प्रतिष्ठानचे संतोष जगताप, राष्ट्रवादीचे विर भिवडी गटाचे अध्यक्ष महेश राऊत, दिपक जावळे, सुमित लवांडे, सुजित जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.

    तर कोव्हीड केअर सेंटरचे नियोजन सरपंच रेवती चांगदेव कुंजीर, उपसरपंच सौरभ कुंजीर राष्ट्रवादी खजिनदार बाजीराव कुंजीर, शरद नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष सुनील कुंजीर, पोलिस पाटील विजय कुंंजंर सामाजिक कार्यकर्ते कैलास कुंजीर, चांगदेव कुंजीर, नाना कुंजीर, युवराज कुंजीर, सुनील एकनाथ कुंजीर, मच्छिंद्र कुंजीर, अबा माचले, मनोज कुंजीर, मोहन कुंजीर, बाळासाहेब कुंजीर, गौतम कुंजीर, भालू भाऊ कुंजीर, बापू तुकाराम कुंजीर, संदीप भाऊ कुंजीर, गणेश इंदलकर, संदिप निगडे व आदी तरुण सहकारी करीत आहेत.