‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ३९ गावे ओडीएफ प्लस : पालकमंत्री भरणे

    सोलापूर : दि सोलापूर जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ३९ गावे ओडीएफ प्लस करून राज्यात सोलापूर जिल्हा परिषदेने चांगली सुरूवात केली आहे. सीईओ दिलीप स्वामी यांनी विविध विकासकामे व कोरोना काळात केलेले काम अतुलनीय आहे, असे मत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.

    जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण समारंभात सीईओ दिलीप स्वामी यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

    यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते, दिलीप स्वामी, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन विभागाची सभापती अनिल मोटे, सहाय्यक जिल्हाधिकारी ओव्हाळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी बाबर, जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते, जि सदस्या स्वाती कांबळे, हेमंत थोरात, शंभुराजे मोरे उपस्थित होते.

    सोलापूर जिल्ह्यातील स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्हा परिषद विशेष प्रयत्न करीत आहे. दिलीप स्वामी यांनी कोरोनाच्या काळात उल्लेखनीय काम केले. त्यांनी राबविलेल्या माझं गाव कोरोना मुक्त गाव ही चळवळ बनली. शासनाने शासन निर्णय काढून ही योजना राज्यभरासाठी लागू केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या अभियानाचा विशेष गौरव केला. वेगवेगळी १६ अभियाने राबवून त्यांनी कोरोना जेवढे नियंत्रित ठेवता येईल तेवढा प्रयत्न केला. त्यांचा गौरव होणे अपेक्षित होते तो झाला. काम केलेल्या माणसाच्या गौरव झालेस काम करणेस हुरूप येतो. आपण जे काही चांगले करीत आहोत ते सांगितले पाहिजे. अनिरूध्द कांबळे यांनी सोलापूर जिल्ह्यात सर्व कुटुंबांना शौचालयाचा वापर करून स्वच्छतेचे सातत्य टिकवण्याचे आवाहन केले.

    जिल्ह्यात ३९ ग्रामपंचायती ओडीएफ प्लस : दिलीप स्वामी

    या ग्रामपंचायतींना सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. या वर्षात ४२५ ग्रामपंचायती ओडीएफ प्लस करणेसाठी प्रयत्न करण्यात आहे. नियोजन आमचे असले तरी गाव पातळींवर प्रभावी अंमलबजावणीसाठी सरपंचांनी प्रयत्न केले पाहिजेत. स्वच्छतेचे सातत्य लाखा असे आवाहन केले.

    कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना उप मुख्य कार्यकारी अघिकारी गोरख शेलार यांनी ओडीएफ प्लस गावाची तालुका निहाय माहिती दिली. अक्कलकोट – १, बार्शी -१ , करमाळा -४, माढा -१, माळशिरस १५ , मंगळवेढा- ५, मोहोळ ३, पंढरपूर -५, सांगोला -२ , उत्तर सोलापूर – १, दक्षिण सोलापूर १, या नुसार ३९ ग्रामपंचायती ओडीएफ प्लस झाले आहेत.

    अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी शेटफळ ओडीएफ प्लस केल्याबद्दल पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. आभार उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी मानले.