ह.भ.प. राणा महाराज वासकर आणि वारकरी संप्रदाय
ह.भ.प. राणा महाराज वासकर आणि वारकरी संप्रदाय

देवळी तालुक्यातील कांदेगाव नदीघाटावर महसूल विभागाने आज पाहणी केली असता नदीपात्र जवळील गावठाण परिसराजवळ एकूण 48 ब्रास अंदाजे किंमत दोन लाख चाळीस हजार रुपयाचा वाळू साठा जप्त करत मंडळ अधिकारी व तलाठी यांनी धाडसी कार्यवाही केली आहे.

  • कार्तिक पौर्णिमेची वारी चुकणार असल्याने वारकरी नाराज
  • पदवीधर मतदार संघाच्या मतदानावरही बहिष्कार
  • मुख्यमंत्र्यांना धरले धारेवर

पंढरपूर (Pandharpur).  विठुरायाच्या भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरच्या पांडुरंगाचे कार्तिक पौर्णिमेला घेतल्या जाणाऱ्या दर्शनाला यंदा वारकऱ्याना मुकावे लागणार आहे; कारण महाराष्ट्र राज्य शासनाने सण उत्सवाला मंदिरात होणारी गर्दी टाळण्यासाठी पंढरपुरात भरणाऱ्या कार्तिक पौर्णिमेच्या यात्रेवर निर्बंध घातले आहेत. यामुळे वारकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. गेल्या आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाला वारकरी संप्रदायाला मुकावे लागले. आता तीच स्थिती कार्तिक पौर्णिमेला ओढावणार असल्याने वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. वारकऱ्यांसाठी वारी नाही तर मुख्यमंत्र्यांनीही श्रीविठ्ठलाची वारी करू नये, अशा रोखठोक शब्दात ह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी राज्य शासनाला सुनावले आहे.

कार्तिकी वारी संदर्भात वारकरी संप्रदायाची भूमिका मांडण्यासाठी महाराज मंडळांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी राणा महाराज वासकर, भागवत महाराज चवरे, विष्णु महाराज कबीर, मनोहर महाराज बेलापुरकर, रंगनाथ महाराज राशनकर, जगन्नाथ महाराज देशमुख, देविदास महाराज ढवळीकर, एकनाथ महाराज हांडे, चैतन्य महाराज देहूकर, गणेश महाराज कराडकर, श्याम महाराज उखळीकर यांच्यासह अन्य महाराज उपस्थित होते.

कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्र शासनाने आषाढी वारी प्रमाणे कठोर निर्बंध लादले आहेत. सरकारने वारकऱ्यांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले आहे. या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रा समन्वय समितीने पुढे होणाऱ्या सर्व निवडणूक मतदान प्रक्रीयेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केले आहे. त्याची सुरुवात येत्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाला एवढे निर्बंध असतील कार्तिकी एकादशीची श्रीविठ्ठलाच्या महापुजेला बाहेरुन कोणीही न येता हि महापूजा प्रांताधिकारी यांच्या हस्ते करावी असे मत महाराजांनी व्यक्त केले आहे.

मतदान करु नये असा करणार प्रचारकार्तिकी वारीत पंढरपुर स्थित सर्व फडकरी महाराज मंडळींना भजन कीर्तनाचे नियम पार पाडावयाचे असल्याने ही कार्तिकी यात्रा झाल्याबरोबर ज्या पदवीधर मतदार संघात निवडणूक आहे. त्या त्या ठिकाणी जाऊन मतदान प्रक्रीयेवर वारकरी, व विठ्ठल भक्तांनी बहिष्कार टाकत मतदान करु नये असा प्रचार दौरा करण्याचे बैठकीत ठरवण्यात आले असल्याचे राणा महाराज वासकर यांनी सांगितले.”