ग्रामीण पाणी पुरवठ्याचे ६७ कोटी वीजबील थकीत ; ३१ मार्च पर्यंत होणार जि.प. बजेट जाहीर

जिल्हा परिषदेचा एक सेवानिवृत्त कर्मचारी प्रवेशद्वारच्या तपासणीत कोरोना रूग्ण असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यालयात प्रवेश करण्या अगोदर कोरोना तपासणी करण्यात येत आहे. दुपार पर्यंत ७० जणांची तपासणी करण्यात आली आहे. यातील एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहीती आरोग्य विभागाने दिली आहे.

    सोलापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पूरवठा विभागाचे गेल्या दोन वर्षा पासून ६७ कोटी वीजबील थकीत असल्याची माहीती मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पञकारांशी बोलाताना सांगितले.

    सोमवारी वीजमहामंडळ अधिकारी समवेत जि.प.मध्ये बैठक घेण्यात आली. सामुहीक ग्रामीण पाणी पूरवठा योजनेतील ग्रामपंचायतीने वीज बील भरणा न केल्यामूळे बील थकीत राहील्याची बाब बैठकीत समोर आली आहे. एप्रिल महीन्यात ग्रामपंचायत स्तरावर कॅम्प आयोजीत करण्यात येणार आहे. वीजबील, पाणीपट्टी, घरपट्टी वसूलीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. बैठकी दरम्यान वीजमहामंडळ जिल्हा परिषदेला १४ कोटी देणे आहे. असे दिलीप स्वामी यांनी सांगितले.

    पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक आचारसंहीता असल्यामूळे यंदाचे बजेट ३१ मार्च पर्यंत प्रशासकीयस्तरावरून जाहीर करण्यात येणार आहे. २५ तारखेला बजेटची सभा अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांनी ठेवली आहे. सभेच्या परवानगीसाठी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाशी पञव्यवहार करणार आहे. आशी ही माहीती मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

    प्रवेशद्वारावरचं तपासणीत आढळला कोरोना रूग्ण