व्याजाने घेतलेले पैसे न दिल्याच्या रागातून खासगी सावकाराने ३१ वर्षीय तरुणाला जिवंत जाळले; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

शिवराज हेगडे याच्या पाठीमागे बंदुक लावुन त्याला चारचाकी वाहनात बसवले. अज्ञात स्थळी नेले.'जमीन देणार नाही, माझे पैसे तुझ्यावर निघतात' असे म्हणत बंद खोलीत डांबुन ठेवले. गेल्या रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी हेगडे यास जंक्शन येथील वनपरिक्षेत्रात नेले.खल्लास करतो असे म्हणत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यास पेटवून दिले.

    इंदापूर: खासगी सावकाराकडून घेतलेले पैसे ने दिल्याच्या कारणावरून ३१ वर्षीय तरुणास जिवंत जाळल्याची धक्कदायक घटना निमगाव केतकी (इंदापूर) तालुका येथे घडली आहे. शिवराज कांतीलाल हेगडे (वय २७ वर्षे. रा.निमगाव केतकी ता.इंदापूर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी नवनाथ हनुमंत राऊत (वय ३२ वर्षे,रा.निमगाव केतकी,ता इंदापूर),सोमनाथ भिमराव जळक (वय ३१ वर्षे,रा.इंदापूर) दोन बेकायदेशीर सावकारांना दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश इंदापूर न्यायालयाने दिले आहेत. २० जून २०२१ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जंक्शन येथील वनपरिक्षेत्रात आरोपींनी आपणास पेटवून दिल्याचे फिर्यादीने मृत्यूपूर्व जबाबात म्हटले आहे.
    फिर्यादी शिवराज हेगडे याने बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय करत होता. आरोपींकडून जमीन तारण ठेवून व्याजाने कर्ज घेतले होते. ते पैसे परत घेण्यासाठी हे दोघांनी त्याच्याकडे तगादा लावला होता. ७ जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हेगडे पेट्रोल भरण्यासाठी निमगाव केतकीतील यशराज पेट्रोल पंपावर आला असताना,आरोपींनी हेगडे याच्या पाठीमागे बंदुक लावुन त्याला चारचाकी वाहनात बसवले.अज्ञात स्थळी नेले.’जमीन देणार नाही, माझे पैसे तुझ्यावर निघतात’ असे म्हणत फिर्यादीस बंद खोलीत डांबुन ठेवले. गेल्या रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी हेगडे यास जंक्शन येथील वनपरिक्षेत्रात नेले.खल्लास करतो असे म्हणत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यास पेटवून दिले.
    हेगडे याने जमिनीवर लोळुन आग विझवली. रस्त्याने जाणाऱ्या लोकांना बोलावून त्यांच्या मदतीने वडीलांना फोन केला.वडीलांनी त्याला इंदापूरातील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात आणले.प्राथमिक उपचारानंतर त्यास पुढील उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे सदरबजार पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक व वैद्यकीय अधिकारी यांचे समक्ष हेगडे याने जबाब व मृत्यूपुर्व जबाब दिला.
    उपचारदरम्यान दि.२२ जून रोजी सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांनी हेगडे हा मरण पावला.दुस-या दिवशी सदर बजार पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाची सर्व कागदपत्रे इंदापूर पोलीसांकडे वर्ग करण्यात आली.फिर्यादी हा उपचारादरम्यान मयत झाल्याने सदर गुन्हयास भा.द.वि.क ३०२ हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धोत्रे अधिक तपास करत आहेत.