नामदेव महाराजांच्या वंशजांसह २० जणांवर गुन्हा दाखल, पंढरपुरात आयोजित केला होता महाद्वार काला

  • देशात कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे देशातील सर्व धर्मांची मंदिरे, मस्जिद तसेच सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. परंतु शासनाच्या निर्णयाचे उल्लंघन करुन पंढरपुरात महाकाला आयोजित केल्याने कार्यक्रममाच्या काही दिवसांनंतर संत नामदेवांच्या वंशजांसह २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे

पंढरपूर – राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांत लॉकडाऊन केला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी या सगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे. कोणतेही कार्यक्रम करताना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन करायचे आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करायचे आहे. परंतु हे सगळे डावलून पंढरपुरात महाकाला आयोजित केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. 

देशात कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे देशातील सर्व धर्मांची मंदिरे, मस्जिद तसेच सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. परंतु शासनाच्या निर्णयाचे उल्लंघन करुन पंढरपुरात महाकाला आयोजित केल्याने कार्यक्रममाच्या काही दिवसांनंतर संत नामदेवांच्या वंशजांसह २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पंढरपुरात महाद्वार काला संपन्न झाला. या काल्यात संत नामदेवांचे वंशजांसह २० जण होते आणि मोठ्या प्रमाणात नागरिकही जमा झाले होते. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.