उजनीतून भीमेत १५ हजार क्युसेकचा विसर्ग, भीमा दुथडी भरून वाहू लागली

उजनीवर या पावसाळा हंगामात आजपर्यंत ५९८ मि.मी. पावसाची नोंद आहे. धरण क्षमतेने भरल्याने १५००० हजार क्युसेकने पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. १६ दरवाज्यातून हा विसर्ग सुरु आहे.

सोलापूर : भीमा व नीरा नदी परिसरात रविवारी रात्रौ दमदार पावसाने हजेरी लावली असून उजनी धरणावर १०० मि.मी. पर्जन्यमान नोंदले गेले आहे. हा प्रकल्प ११० टक्के भरल्याने या प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडून १५ हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. याच बरोबर वीरमधून नीरेत १३ हजार क्युसेकने पाणी विसर्ग होत असल्याने नीरा व भीमा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.

उजनीवर या पावसाळा हंगामात आजपर्यंत ५९८ मि.मी. पावसाची नोंद आहे. धरण क्षमतेने भरल्याने १५००० हजार क्युसेकने पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. १६ दरवाज्यातून हा विसर्ग सुरु आहे. वीज निर्मितीसाठी १६०० क्युसेक पाणी सोडले जात असल्याने भीमेत एकूण १६६०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. धरणात १११ टक्के पाणीसाठा झाला आहे. प्रकल्पातून सीना माढा उपसा सिंचन योजनेसाठी २९९, दहिगाव योजनेसाठी १०५, बोगद्यात १ हजार तर मुख्य कालव्यात २६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे.

दरम्यान नीरा नदी परिसरातही पावसाची हजेरी आहे. तेथील धरणं भरल्याने वीरमधून पाणी सोडले जात आहे. या पाण्यामुळे नीरा व संगमच्या पुढे भीमा दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीकाठी सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. रविवारी रात्री नीरा खोऱ्यात पावसाची हजेरी होती. उजनी धरण १११ टक्के भरल्याने याचे सोळा दरवाजे उघडून १५ हजार क्युसेक पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडले जात आहे.