जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढलेल्या शेतकऱ्याने मागण्या मान्य न झाल्यास विष पिऊन आत्महत्या करण्याचा दिला इशारा; परिसरात खळबळ

टॉवरवर चढलेल्या शेतकऱ्याला खाली उतरण्याचे आवाहन जिल्ह्याधिकाऱ्यांकडून केले जाते आहे. कुबेर चिमाजी घाडगे असेटॉवर चढलेल्या शेतकऱ्याचे नाव असून आज एक शेतकरी सकाळी १० वाजल्यापासून चढून बसले आहेत.

    सोलापूर: शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय(Collector’s office) परिसरातील टॉवरवर चढत मागण्या ,मान्य न झाल्यास शेतकऱ्यांने (Farmer) विष पिऊन (drinking poison)आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. बघ्यांची मोठी गर्दी निर्माण झाली असून, टॉवरवर चढलेल्या शेतकऱ्याला खाली उतरण्याचे आवाहन जिल्ह्याधिकाऱ्यांकडून केले जाते आहे. कुबेर चिमाजी घाडगे असेटॉवर चढलेल्या शेतकऱ्याचे नाव असून आज एक शेतकरी सकाळी १० वाजल्यापासून चढून बसले आहेत.

    घाडगे हे पंढरपूर तालुक्यातील देगावचे रहिवासी आहेत. सातबारा उतर्यावर गावच्या तलाठी, कोतवाल आणि सर्कल अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने नोंदी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचा सातबारा उतारा दुरुस्त करून मिळावा अन्यथा दुपारी दोन नंतर विष पिऊन टॉवर वरून उडी मारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

    मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही तिसरी घटना आहे. नुकतं १५ ऑगस्ट दिवशी मुंबई मंत्रालय येथे आंबेगाव येथील शेतकऱ्यांनेही विष प्राशन केले होते, अन उपचार दरम्यानचा त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.