पंढरीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या 

शहरालगत असलेल्या भागात राहणारी मयुरी महादेव कांबळे या 19 वर्षीय तरूणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

    पंढरपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शहरातील इसबावी उपनगरात राहणाऱ्या १९ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, युवतीने आत्महत्या का केली, यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
    याबाबत पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरालगत असलेल्या भागात राहणारी मयुरी महादेव कांबळे या 19 वर्षीय तरूणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घरामध्ये कोणीही नसताना घराच्या दरवाजाला आतून कडी लावून घेऊन या तरुणीने गळफास घेतला. काल सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या मुलीच्या आत्महत्येने तिच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
    या आत्महत्येमागचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. मात्र, या घटनेची नोंद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस या घटनेची अधिक चौकशी आणि तपास करीत आहेत.