वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; आनंद चंदनशिवे यांच्यासह दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राज्यात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण वंचितचे प्रदेश प्रवक्ते आणि सोलापूर महापालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे आपल्या दोन नगरसेवकांसह राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. आनंद चंदनशिवे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पालिकेतील पक्षाची ताकद वाढणार आहे.

    सोलापूर : राज्यात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण वंचितचे प्रदेश प्रवक्ते आणि सोलापूर महापालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे आपल्या दोन नगरसेवकांसह राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

    दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याच्या होत्या चर्चा. आनंद चंदनशिवे यांनी आधी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बरोबर सलगी केली होती. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

    दोन नगरसेवक राष्ट्रावादीत प्रवेश करणार

    आनंद चंदनशिवे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पालिकेतील पक्षाची ताकद वाढणार आहे. बहुजन समाज पार्टीतून आनंद चंदनशिवे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला होता. मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. आनंद चंदनशिवे यांच्यासोबत नगरसेवक गणेश पुजारी , ज्योती बमगोंडा हे दोन नगरसेवक राष्ट्रावादीत प्रवेश करणार आहे.

    आनंद चंदनशिवे 2017 च्या महापालिका निवडणुकीत, दोन नगरसेवकासह निवडून आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्याविरोधात शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यात चंदनशिवे यांना 27 हजार मते मिळाली होती.