अनैतिक संबंधात पती ठरत होता अडथळा; लोखंडी पाईपने केली मारहाण

    अकलूज : ‘माझे आणि तुझ्या बायकोचे अनैतिक संबंध आहेत. तू आमच्यामध्ये वारंवार का येतोस?’ असा जाब विचारत एका व्यक्तीस लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केल्याची घटना अकलूज येथे घडली आहे.

    फिर्यादी विकास सुर्यकांत डिकोळे (वय ३३ वर्षे, धंदा मजुरी, रा. माळखांबी ता. माळशिरस) यांनी ५ जूनला साडेसातच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ राजकुमार सुर्यकांत डिकोळे व त्याचा मित्र परमेश्वर साबळे हे दोघे मोटार सायकलवरून माळखांबी येथून अकलूज येथे केळीचे पट्टीचे पैसे घेण्यासाठी आले असता त्यांना मसुदमळा अकलूज येथे यातील आरोपी मयूर रानू पारसे याने गाठून राजकुमार डिकोळे (जखमी) यास मोठमोठ्याने शिवीगाळ करून आरोपी मयूर पारसे याचे व जखमी व्यक्तीच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून त्यास अडथळा दूर करण्यासाठी राजकुमारला ‘तू बायकोला भेटायला का आला, तुला सांगितलेले समजत नाही का? आमचे दोघांमध्ये तू कशाला येतोय, आता तुला जिवंतच सोडत नाही’ असे म्हणून आरोपी मयुर रानु पारसे (रा. मसुदमळा चौक, अकलुज) याने सोबत आणलेल्या लोखंडी पाईपसारखे हत्याराने राजकुमार डिकोळे याचे डोकीत, डोळयावर, नाकावर व पाठीवर मारून त्यास गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

    अशा मजकूरचे तक्रारीवरुन अकलूज पोलीस ठाणेस गु.र.नं. 383/2021 भा.द.वि.सं.क. 307, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी मयुर रानू पारसे यास अटक करण्यात आली. ११ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, सोलापूर ग्रामीण,  नीरज राजगुरु, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज विभाग अकलुज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर हे करीत आहेत.