‘माझे मुलं, माझी जबाबदारी” सीईओंची नवी मोहीम ; बारा लाख मुलांसाठी वैदयकीय पथक

मुलांच्या आरोग्यसाठी जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.महीला व बालकल्याण ,प्राथमिक,माध्यमिक शिक्षण विभागाकडून मुलांची आकडेवारी उपलबध्द करण्यात आली आहे. ४ जून रोजी बालकांसाठी मास्टर ट्रेनर, ५ ते ६ जून रोजी तालूकास्तरावर गावनिहाय कृती नियोजन ठरविण्यात येईल,७ आणि ९ जून दरम्यान तपासणी पथकातील सदस्य व आशा, अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

  सोलापूर : माझं गाव कोरोना मुक्त गाव यशस्वी संकल्पने पाठोपाठ सीईओ दिलीप स्वामी यांनी माझे मुलं माझी जबाबदारी कोरोना प्रतिबंधासाठी नवी मोहीम आखली आहे. जिल्हयातील बारा लाख मुलांसाठी वैदयकीय पथके तैनात करण्यात आली आहे.

  या मोहीमे संदर्भात सीईओ स्वामी यांनी अधिकारी वर्गालाप़त्रा द्वारे आदेशीत केले आहे.संभाव्या तिसऱ्या लाटे अधीचं जिल्हा परिषदेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.४ जून पासून कर्मचाऱ्याना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १० जून पासून माझे मुलं माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे.संभाव्या तिसऱ्या लाटेत ० ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना संसर्गाची बाधा होण्याची शक्यता शासनाकडून वर्तविण्यात येत असल्यामूळे खबरदारीचा उपाय म्हणून तिसऱ्या लाटे आधीचं काळजी घेण्यात येत आहे.

  केंद्र सरकारचं लसीकरणाबाबतचं धोरण चुकलंय का?

  View Results

  Loading ... Loading ...

  मुलांच्या आरोग्यसाठी जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.महीला व बालकल्याण ,प्राथमिक,माध्यमिक शिक्षण विभागाकडून मुलांची आकडेवारी उपलबध्द करण्यात आली आहे. ४ जून रोजी बालकांसाठी मास्टर ट्रेनर, ५ ते ६ जून रोजी तालूकास्तरावर गावनिहाय कृती नियोजन ठरविण्यात येईल,७ आणि ९ जून दरम्यान तपासणी पथकातील सदस्य व आशा, अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १० जून ते १० जूलै दरम्यान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एनएचएम अंर्तगत बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी पथक तयार करण्यात येणार आहेत. अंगणवाडी,शाळा ,आयटीआय,महाविदयालय मुलांच्या आरोग्य पत्रिका तयार करण्यात आल्या आहेत.