asi head constable and home guard suspended in rape case nrvb

अत्याचारीत मुलीस काहीही स्पष्ट सांगता येत नाही. या मुलीस सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी तपासले असता ती सात महिन्याची गर्भवती असल्याचे सांगून तिचे वय कमी असल्याने सिजर करून मुलीची प्रसुती केली व दीड किलो वजनाचा एक मुलगा झाला आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्याने, तात्काळ पोलिसांना पाचारण करून त्यांना या घटनेबाबत माहिती दिली.

    पंढरपूर : पंढरपूर शहरातील भोसले चौकानजीक राहणाऱ्या महिलेच्या बारा वर्षीय मुलीवर एका अज्ञात इसमाने अत्याचार केल्याने सदर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहून तिला शासकीय दवाखान्यात मूल झाले आहे. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका बारा वर्षीय मुलीवर एका अज्ञात इसमाने सुमारे दि.१२ जून १९ पूर्वी गर्भवती करून आई बनवले आहे. सदर घटनेबाबत अत्याचारीत मुलीस काहीही स्पष्ट सांगता येत नाही. या मुलीस सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी तपासले असता ती सात महिन्याची गर्भवती असल्याचे सांगून तिचे वय कमी असल्याने सिजर करून मुलीची प्रसुती केली व दीड किलो वजनाचा एक मुलगा झाला आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्याने, तात्काळ पोलिसांना पाचारण करून त्यांना या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर पंढरपूर शहर पोलिसांनी अत्याचारित मुलगी व लहान बाळास आयसीयूमध्ये दाखल केले आहे. अत्याचारित मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार, पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अत्याचार केल्याचा गुन्हा भादवी कलम ३७६ ३७६ (२) आय जे, बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ९ प्रमाणे पोलिसांनी नोंद केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पंढरपूर शहर पोलिस करत आहेत.

    पंढरपूर शहरात मध्यवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे पंढरपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून केवळ बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला आई बनवण्याच्या प्रकारामुळे या घटनेची शहरात सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.