solapur Zp

सीईओ स्वामी यांनी पंढरपूर तालूक्यातील कोविड परिस्थितीचा आढावा व ग्राम रक्षा समीतीची बैठक घेतली. यावेळी पंढरपूर तालूक्यातील तावशी येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली तसेच रुग्णांना ताणतणाव व्यवस्थापनावर प्रबोधन केले.

    सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्याची दखल भारत सरकारच्या पंचायात अभियानानी घेतली आहे. कोरोना आपत्ती काळात भरीव कार्याबदल कौतुकस्पद कामगिरी केल्याचे म्हटले आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सोलापूर ग्रामीण मध्ये कोरोना संसर्गा धुमाकूळ घातला. या लाटेत खुद्द सीईओ स्वामी हे देखील बाधित झाले. दुसऱ्या लाटेची चाहूल लागल्यानंतर सीईओ स्वामी यांनी “माझे गाव कोरोना मुक्त गाव” व “माझे दुकान माझी जबाबदारी” हे अभियान सुरू केले. या अभियानाची अंमलबजावणी होते किंवा कसे हे पाहण्यासाठी सीईओ स्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यातील गाव-खेड्यातून दौरे केले. दरम्यान सीईओ स्वामी हे स्वतः कोरोना बाधित झाल्यानंतर त्यांनी दवाखान्यात दाखल असताना “वर्क फ्रॉम हॉस्पिटल” सुरू ठेवले. कोरोनातून बरे झाल्यानंतर दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढत असताना लोक चाचणीसाठी समोर येत नाहीत व आजार अंगावर काढत आहेत व परिणामी रुग्ण गंभीर अवस्थेत जाऊन मृत्यू पावत आहेत हे लक्षात आले. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गावापासून दूर तालुक्याच्या ठिकाणी क्वारंटाइन व्हावे लागते या भितीपोटी लोक कोरोना चाचणीसाठी समोर येत नाहीत व आजार लपवत आहेत ही बाब स्वामी यांनी लक्षात घेऊन गावातच जर कोविड केअर सेंटर स्थापन झाले तर गावातच उपचार आणि घरचे जेवण याची सोय ह्या उद्देशाने “गाव तिथे कोविड सेंटर” हे अभियान ५००० किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात सुरू केले. आज अखेर सोलापूर जिल्ह्यात ६० पेक्षा जास्त कोविड केअर सेंटर या अभियानांतर्गत स्थापन करण्यात आले आहेत. यामुळे लोक चाचणीसाठी समोर येत आहेत आणि मृत्यूचे प्रमाणही कमी होताना दिसून येत आहे. याच बरोबर कोविड केअर सेंटर मधील रूग्णांसाठी ताणतणाव व्यवस्थापनासाठी सीईओ स्वामी हे अनेक कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांचे स्वतः प्रबोधन करीत आहेत. याशिवाय दररोज सकाळी पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन कोविड केअर सेंटरवर करण्यात येत आहे.

    दिनांक २७ मे रोजी सीईओ स्वामी यांनी पंढरपूर तालूक्यातील कोविड परिस्थितीचा आढावा व ग्राम रक्षा समीतीची बैठक घेतली. यावेळी पंढरपूर तालूक्यातील तावशी येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली तसेच रुग्णांना ताणतणाव व्यवस्थापनावर प्रबोधन केले. सीईओ स्वामी यांच्या या भेटीची दखल भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने घेतली व त्यांच्या ट्विटर हैन्डलवर या स्वामी यांच्या भेटीचा फोटो अपलोड करून ” सीईओ सोलापूर जिल्हा परिषद यांनी कोविड कमी करण्याच्या तत्परतेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी तावशी गावाला भेट दिली आणि कोरोना व्हायरस विरूद्धच्या सामूहिक लढाईत तळागाळातून पुढाकार घेणाऱ्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या कामाची स्तुती करून त्यांच्या नैतिकतेला चालना देण्याचे काम केले” असे ट्विट केले आहे.

    यावेळी पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके,सरपंच गणपत यादव, उपसरपंच अमोल कुंभार व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक ज्योती पाटील, विस्तार अधिकारी अशोक नलवडे जेष्ठ समाजसेवक बाळासाहेब यादव, जेष्ठ नागरिक, तलाठी मुकुंद घोगरदरे, आरोग्य सेवक, आशा वर्कर्स, ग्रामपंचायत कर्मचारी, तावशी ग्रामस्थ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील २५ बेडचे कोविड केअर सेंटरचे देखील फोटो पंचायत राज मंत्रालयाने ट्वीट करून अभिनंदन केले आहे.