केंद्र सरकारच्या विरोधात मोहोळ तालुक्यात बोंबाबोंब आंदोलन

    मोहोळ : मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने व तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

    गॅस, डिझेल,पेट्रोल व खाद्य तेल तसेच शेती विषयक खते, बियाणे व इतर सर्व पदार्थांच्या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात ५ जुलै रोजी मोहोळ तहसील कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सर्व सेलच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

    यावेळी मोहोळ तालुका पंचायत समितीच्या सभापती रत्नमाला पोतदार, पंचायत समिती सदस्य तथा महिला तालुकाध्यक्ष सिंधु वाघमारे, महिला शहराध्यक्ष यशोदा कांबळे, अध्यक्ष अविना राठोड, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष धनाजी गावडे, उपनगराध्यक्ष प्रमोद उर्फ बापु डोके, मोहोळ तालुका युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राहुल मोरे, शहराध्यक्ष कुंदन भैय्या धोत्रे, उपाध्यक्ष हेमंत गरड, माजी नगराध्यक्ष संतोष सुरवसे, नगरसेवक संतोष खंदारे, कार्याध्यक्ष अतुल गावडे, कार्याध्यक्ष विकास कोकाटे, उपाध्यक्ष राजू सलगर, राजू सुतार, स्मिता कोकणे, संपदा निचळ, कांता गुंड, लता पाटील, शहर कार्याध्यक्ष नागेश बिराजदार, रामा करे यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक डुणगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.