संचारबंदी काळात जडवाहतुकीसाठी पर्यायी मार्ग; पोलिस अधिक्षकांचे आदेश जारी

  सोलापूर : कोरोनाच्या संसर्गामुळे आषाढी वारीसाठी 10 मानाच्या पालख्यांना शासनाने परवानगी दिली असून, याव्यतिरिक्त वारकरी, भाविक जडवाहतुकीने पंढरपूर शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे 17 ते 24 जुलै 2021 कालावधीसाठी अत्यावश्यक वाहने वगळून पंढरपूर शहरातून जाणारी जड वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जारी केले आहेत.

  हे आदेश 17 जुलैच्या दुपारी बारा वाजेपासून 24 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

  आषाढी वारीच्या अनुषंगाने जड वाहतूक बंद करण्याची ठिकाणे :

  अ.क्र. पोलीस ठाणे –

  जड वाहतुक प्रवेश बंद ठिकाणे

  पर्यायी मार्ग

  1 ) मोहोळ

  शिवाजी चौक

  मोहोळ-कामती-मंगळवेढा-सांगोला किंवा मोहोळ-शेटफळ-टेंभूर्णी-वेळापूर-सांगोला

  2) शेटफळ चौक

  शेटफळ-टेभूर्णी-अकलुज-वेळापूर-महुद-सांगोला किंवा शेटफळ-मोहोळ-कामती-मंगळवेढा-सांगोला

  3) टाकळी सिकंदर

  टाकळी सिकंदर-कुरूल-मोहोळ-शेटफळ-टेंभूर्णी किंवा टाकळी सिकंदर-कुरुल-कामती-सांगोला-महुद-वेळापूर

  4) कामती

  कुरुल चौक

  कुरूल-कामती-मंगळवेढा-सांगोला-महूद-वेळापूर-अकलुज किंवा कुरूल- मोहोळ-शेटफळ-टेंभुर्णी -अकलुज वेळापूर

  5) टेंभुर्णी

  वेणेगाव फाटा

  वेणेगाव -टेंभुर्णी-अकलुज-वेळापूर-महुद -सांगोला किंवा वेणेगाव-शेटफळ -मोहोळ-कामती-मंगळवेढा-सांगोला

  6) अकलुज रोड

  टेंभूर्णी-शेटफळ-मोहोळ- कामती-मंगळवेढा-सांगोला किंवा टेंभूर्णी-इंदापूर मार्गे इच्छीत स्थळी

  7) वेळापूर

  वेळापूर चौक

  वेळापूर-साळमुख-महुद-सांगोला-मंगळवेढा-कामती-किंवा वेळापूर -अकलूज -टेंभूर्णी-शेटफळ -मोहोळ-कामती

  8) साळमुख चौक

  साळमुख- महुद- सांगोला-मंगळवेढा -कामती किंवा साळमुख- वेळापूर-अकलुज-टेंभुर्णी-शेटफळ-मोहोळ- कामती

  9) सांगोला

  महुद चौक

  महुद- सांगोला-मंगळवेढा-कामती-मोहोळ-किंवा महुद-वेळापूर-अकलुज-टेभुर्णी-शेटफळ-मोहोळ

  10) पंचायत समिती सांगोला

  सांगोला-मंगळवेढा-कामती-मोहोळ-शेटफळ-टेंभुर्णी किंवा महुद-वेळापूर -अकलुज-टेंभुर्णी-शेटफळ-मोहोळ

  11) मंगळवेढा

  मंगळवेढा नाका बायपास

  मंगळवेढा -कामती-मोहोळ-शेटफळ-टेंभुर्णी किंवा मंगळवेढा -सांगोला-महुद-वेळापूर-अकलुज-टेंभूर्णी

  12) करकंब

  खेड भोसे पाटी

  करकंब-वेणेगाव-टेंभुर्णी-अकलुज-वेळापूर-महुद-सांगोला किंवा करकंब-वेणेगाव-शेटफळ-मोहोळ-कामती-मंगळवेढा -सांगोला