विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! फेरारी गाडीसारखा गेअर बॉक्स आसलेल्या ई रिक्षातून मंदिरापर्यंत पोहचणार

विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी विविध राज्यातून भाविक पंढरपुरात येतात. या भाविकांमध्ये अपंग भाविकांचाही समावेश आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत जाण्यास अशा भाविकांना त्रास होत होता. या भाविकांची ये - जा करण्याची सोय व्हावी. या हेतूने १० लाख रुपये किंमतीच्या प्रदूषणमुक्त २ ई रिक्षा मंदिर समितीला ॲड. माधवी निगडे वेलफेअर फाऊंडेशन व वेणू सोपान वेलफेअर फाऊंडेशन यांनी संयुक्तरीत्या भेट दिल्या आहेत.

    पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी विविध राज्यातून भाविक पंढरपुरात येतात. या भाविकांमध्ये अपंग भाविकांचाही समावेश आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत जाण्यास अशा भाविकांना त्रास होत होता. या भाविकांची ये – जा करण्याची सोय व्हावी. या हेतूने १० लाख रुपये किंमतीच्या प्रदूषणमुक्त २ ई रिक्षा मंदिर समितीला ॲड. माधवी निगडे वेलफेअर फाऊंडेशन व वेणू सोपान वेलफेअर फाऊंडेशन यांनी संयुक्तरीत्या भेट दिल्या आहेत. या ई रिक्षात फेरारी गाडीसारखा गेअर बॉक्स आहे. अशा ई रिक्षात फिरणार विठ्ठल भक्त ये जा करणार आहे.

    श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लोक येतात. यामध्ये अधिक वयस्कर भविकांचा सहभाग बसतो. त्याचबरोबर अपंग व आजारामूळे चालता येत नसलेले भाविक देखील विठूरायाच्या दर्शनासाठी येतात. परंतु चौफाळा व महाद्वार चौकातून मंदिराकडे चार चाकी वाहन नेण्यास बंदी आहे. यामुळे अपंग व आजारामूळे चालता येत नसलेल्या भाविकांना मंदिराकडे जाताना खूप त्रास होत होता. अशा भाविकांची सोय करावी अशी मागणी वारकरी व भाविकांकडून होत होती. याची दखल घेत ॲड. माधवी निगडे वेलफेअर फाऊंडेशन व वेणू सोपान वेलफेअर फाऊंडेशन यांनी संयुक्तरित्या खर्च करून मंदिर समितीला दोन ई रिक्षा भेट दिल्या आहेत.