कुरुल येथे अंगणवाडीत पोषण अभियान; चार बालकांना घेतले दत्तक

    मोहोळ / नवराष्ट्र न्युज नेटवर्क : राष्ट्रीय पोषण महिना अभियान १ ते ३० सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार दत्तक पालक योजने अंतर्गत कुरूल ग्रामपंचायतच्या वतीने कमी वजनाच्या चार बालकांना पौष्टिक आहार वाटप करण्यात आला.

    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून महापोषण महिना अंतर्गत ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांची एक दिवस अंगणवाडी भेट या संकल्पनेनुसार सरपंच चंद्रकला पाटील, उपसरपंच पांडुरंग जाधव, माणिक पाटील, सदस्य बाळासाहेब लांडे, सुभाष माळी यांनी गावातील व घोडके वस्ती अंगणवाडीला भेट देऊन तेथील चार कमी वजनाच्या बालकांना पौष्टिक आहार वाटप करण्यात आला. या चार बालकांचे पालकत्व या पदाधिकाऱ्यांनी घेऊन त्यांना कुपोषण मुक्त करण्याचा संकल्प केला.

    यावेळी कुरुल बिटच्या पर्यवेक्षक कल्पना झंपले यांनी कमी वजन बालकांच्या पालकांना आहार, आरोग्य व बालकांच्या वजनवाढ याबाबत मार्गदर्शन केले.

    यावेळी ग्रामविकास अधिकारी एस.डी. खंदारे, वरिष्ठ लिपिक संतोष जाधव, ऑपरेटर लांडे, अंगणवाडी सेविका शोभा कुंभार, संगीता रोडे, कविता खरात, अंजली माने, जयश्री अंकुशराव, मदतनीस एस. बी. गायकवाड, ए. एस. शिंदे, सी. पी. जाधव आदी उपस्थित होते.