कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने ; हस्तांदोलन करुन केली विचारपूस

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या गर्दी वाढू नये म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर तंबू ठोकून तसेच पोलिसांच्या बंदोबस्तात आत मध्ये येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे त्यामुळे जिल्हा परिषद परिसर वाहने मुक्त दिसत आहे काही प्रमाणात गर्दी कमी झाली आहे, दरम्यान सकाळी बारा वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची मुख्य इमारतीमध्ये एन्ट्री झाली त्याच वेळी माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे आक्रमक सदस्य त्रिभुवन धाईंजे थांबले होते मात्र या दोन्ही नेत्यांनी आपला राजकीय विरोध विसरून एकमेकांना हस्तांदोलन केले

    सोलापूर : झेडपी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार त्रिभुवन धाईंजे हे कटटर प्रतिस्पर्धी मुख्यालयात गेल्या दिड वर्षात प्रथमचं आमने सामने येत हस्तांदोलन एकमेकांची विचारपूस केली.

    सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या गर्दी वाढू नये म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर तंबू ठोकून तसेच पोलिसांच्या बंदोबस्तात आत मध्ये येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे त्यामुळे जिल्हा परिषद परिसर वाहने मुक्त दिसत आहे काही प्रमाणात गर्दी कमी झाली आहे, दरम्यान सकाळी बारा वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची मुख्य इमारतीमध्ये एन्ट्री झाली त्याच वेळी माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे आक्रमक सदस्य त्रिभुवन धाईंजे थांबले होते मात्र या दोन्ही नेत्यांनी आपला राजकीय विरोध विसरून एकमेकांना हस्तांदोलन केले त्यामुळे आजूबाजूला थांबलेल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला दोघांनी एकमेकांना कसं काय चाललंय याची विचारणा केली दरम्यान अध्यक्ष कांबळे यांनी मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर बसलेल्या शिपायाला व्यवस्थित काम करा आता सर्व वेळेवर येत आहेत ना याची विचारणा केली गर्दी कमी झाल्याने आता जरा चित्र बर आहे असे अध्यक्ष म्हणाले, सध्या त्रिभुवन धाइंजे यांनी जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागातील पोषण आहार घोटाळ्याचा मुद्दा उचलून धरला आहे त्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत त्याचा पाठपुरावा त्यांनी कायम ठेवला असून अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून अहवाल कधी येतोय याची ते वाट पाहत आहेत दरम्यान समितीकडून अहवाल येण्यास दिरंगाई होत असल्या प्रकरणी त्यांनी संताप ही व्यक्त केला.