सोलापुरात मराठा कार्यकर्त्यांची धरपकड; आक्रोश मोर्चात पोलिसांचा तगडा बंदोबस्त- आ. मोहिते पाटील यांचा ताफा रोखला

या आंदोलनात महापौर कांचना यन्नम यांनी सहभाग घेत मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शवला आहे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. पोलिसांच्या धर पकडीवर नाराजी व्यक्त केली आहे. 

    सोलापूर: सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चाच्या कार्यकर्त्यांची धरपकड होत असून मोर्चात सहभागी होणाऱ्या नेते मंडळींचा ताफा रोखण्यात येत आहे. पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.  सकाळच्या सुमारास माजी आमदार नरसय्या आडम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर अकलूज वरून निघालेल्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा ताफा टेंभुर्णी येथे पोलिसांनी रोखून धरला आहे. हजारोंच्या संख्येने सहभाग कार्यकर्ते नोंदवत आहेत एक मराठा लाख मराठा या घोषवाक्याने सारा परिसर दणाणून निघत आहे.

    विविध राजकीय पक्षातील नेतेमंडळींनी मोर्चात हजेरी लावली आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांनी पोलिसांच्या तगडा बंदोबस्त बंदोबस्त विरोधात आक्षेप नोंदवला आहे. महा विकास आघाडी सरकारच्या सांगण्यावरून पोलीस दडपशाही करत असल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केला आहे.

    या आंदोलनात महापौर कांचना यन्नम यांनी सहभाग घेत मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शवला आहे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. पोलिसांच्या धर पकडीवर नाराजी व्यक्त केली आहे.  पुणे नाका येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आक्रोश मोर्चास सुरुवात झाली आहे. हजारो मराठा समाज बांधव उपस्थित झाले आहेत. ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालय मार्फत शहरात येणाऱ्या मुख्य रस्ते अडवण्यात आले आहेत. शहर सोलापूर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.