पोलीस प्रशासनाकडून ‘सिटू’चे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होताच संयम कामगार व कार्यकर्ते आक्रमक ; माजी आमदार कॉ. आडम मास्तर यांच्यासह शेकडो आंदोलकांना अटक!

२४ तासाच्या आत निर्णय जाहीर न केल्यास उग्र आंदोलन करणार! : कॉ. नरसय्या आडम (मास्तर)

    सोलापूर : सोलापूर शहरातील बाजारपेठा प्रामुख्याने विडी व यंत्रमाग कारखाने तात्काळ सुरु करा हि प्रमुख मागणी घेऊन शहर आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सोलापूर महानगर पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांना सिटूचे शिष्टमंडळ चर्चेसाठी कार्यालयात जाताच पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून शेकडो महिला विडी कामगार आणि कार्यकर्ते यांच्यावर लाठी उगारून जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्यांची पोलीस मुख्यालयात रवानगी केली. वास्तविक हे धरणे आंदोलन अत्यंत शांततेत व संयमतेने सुरु असताना आंदोलन दडपून टाकणे हेच का? कायदा आणि सुव्यवस्था असा सवाल करत २४ तासाच्या आत निर्णय जाहीर न केल्यास आणखी उग्र स्वरूपाचे आंदोलन गनिमीकाव्याच्या पद्धतीने करण्याचा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिला.

    गुरुवार दि. ३ जून २०२१ रोजी सेंटर ऑफ इंडियन्स च्यावतीने विडी व यंत्रमाग कारखाने आणि बाजारपेठा तातडीने सुरु करा हि प्रमुख मागणी घेऊन सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगर पालिका मा. आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

    सुरुवातीला सिटूचे सर्व पदाधिकारी महिला विडी कामगार आणि कार्यकर्ते कोविड-१९ चे सर्व नियम पाळत शांततेत सोलापूर महानगर पालिका मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी दाखल झाले. तद्नंतर विडी व यंत्रमाग कारखाने चालू करा, बाजारपेठा चालू करा अशा मागण्यांचे फलक दाखवत जोरदार घोषणाबाजी करत महापालिका प्रशासना विरुद्धचा आक्रोश व्यक्त केले. यावेळी मा. पोलीस उपायुक्त, सहा.पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलिसांचा ताफा संपूर्ण आंदोलकांना घेराव घालून दबावाखाली आणले. व लाठी उगारत, झटपट करत महिला विडी कामगारांना व कार्यकर्त्यांना बळाचा वापर करत शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले.

    कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या प्रमुख उपस्थितीत सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख, माकपच्या नगरसेविका कामिनिताई आडम, माजी नगरसेविका नसीमा शेख, सुनंदाताई बल्ला आदींचे शिष्टमंडळ मा. आयुक्त पी.शिवशंकर यांना समक्ष भेटून निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. चर्चेअंती लेखी आश्वासन दिले. सादर आश्वासनात आपल्या मागण्याबाबत २४ तासात निर्णय घेण्यात येईल. तसेच प्रशासनाकडून लॉकडाऊनचे निर्बंध उठविण्याचे प्रयत्न चालू आहेत. असे लेखी आश्वासन दिले.

    यावेळी सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख (मेजर), शेवंताताई देशमुख, हनीफ सातखेड, सलीम मुल्ला, फातिमा बेग, दीपक निकंबे,अनिल वासम, सनी शेट्टी,मुरलीधर सुंचू, लिंगव्वा सोलापूर, शकुंतला पाणीभाते, किशोर मेहता, दाउद शेख, नरेश दुगाणे, जावेद सगरी, अकिल शेख, अशोक बल्ला, दत्ता चव्हाण, बाबू कोकणे, शहाबुद्दीन शेख, श्रीनिवास गड्डम, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, महादेव घोडके, प्रवीण आडम, अंबादास बिंगी, रवी गेंटयाल, मल्लिकार्जुन बेलीयार, किशोर गुंडला, राम मरेड्डी आदींसह शेकडो आंदोलक सहभागी झाले.