आषाढी यात्रा; मठ, धर्मशाळांना पोलिसांची नोटीस

आषाढी यात्रा काळात यंदाही 17 जुलैपासून 24 जुलैपर्यंत 9 दिवस संचारबंदी लागू केली आहे. मात्र असे असताना काही भाविक त्यापूर्वीच पंढरपूरमध्ये विविध मठात दाखल होण्यास सुरुवात झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आता अशा भाविकांना बाहेर घालवण्यासाठी सर्व मठ आणि धर्मशाळांना पोलिसांनी नोटीस बजावल्या असून तपासणीमध्ये जे भाविक पंढरपूरमध्ये आषाढीसाठी वास्तव्याला आलेले असतील त्यांना पोलिस शहराबाहेर पाठवून देणार आहेत.

    पंढरपूर : आषाढी यात्रा काळात यंदाही 17 जुलैपासून 24 जुलैपर्यंत 9 दिवस संचारबंदी लागू केली आहे. मात्र असे असताना काही भाविक त्यापूर्वीच पंढरपूरमध्ये विविध मठात दाखल होण्यास सुरुवात झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आता अशा भाविकांना बाहेर घालवण्यासाठी सर्व मठ आणि धर्मशाळांना पोलिसांनी नोटीस बजावल्या असून तपासणीमध्ये जे भाविक पंढरपूरमध्ये आषाढीसाठी वास्तव्याला आलेले असतील त्यांना पोलिस शहराबाहेर पाठवून देणार आहेत.

    आषाढीसाठी मानाच्या 10 पालखी सोहळ्यातील 400 भाविक आणि 195 मठाधिपती यांना शासनाने शहरात थांबण्याची परवानगी दिलेली आहे. परवानगी दिलेले वारकरी सोडून जे भाविक आषाढीपूर्वी दाखल झाले आहेत त्यांना बाहेर काढण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. अजूनही पंढरपूरमध्ये करोनाचे संकट संपलेले नसल्याने भाविकांच्या आरोग्यासाठी हे पाऊल उचलले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.