निर्धार मेळाव्यामध्ये सहभागी व्हा; रामराव वडकुते यांचे आवाहन

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सोलापूर येथे मंगळवारी (दि. ३१) होत असलेल्या ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने समाजाच्या विविध मागण्यांसाठी होत असलेल्या भव्य निर्धार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार रामराव वडकुते यांनी केले.

    भटके-विमुक्त मुक्ती दिनानिमित्त ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने भव्य निर्धार मेळावा होत असून यासंबंधीची मोहोळ तालुका नियोजन बैठक रविवारी (दि. २९) मोहोळ येथील लोकसेवा कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडली. यावेळी माजी आमदार रामराव वडकुते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर, धनंजय बीडदे, राजाभाऊ बुद्धाळ, ज्येष्ठ नेते संजय क्षीरसागर, सुरेश शिवपुजे, कृष्णदेव वाघमोडे, पोपट हांडे, युवा नेते सोमेश क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    पुढे बोलताना ते म्हणाले की, जोपर्यंत ओबीसींना सरकार आरक्षण देणार नाही, तोपर्यंत राज्यातील एक ही निवडणूक ओबीसी समाज होऊ देणार नसून ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाची अंमलबजावणी, ओबीसींना शिष्यवृत्तीमध्ये वाढ, ओबीसी इम्पेरीकल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर करावा, स्वतंत्र वसतिगृह यासह अनेक मागण्या ओबीसी समाजाच्या असून, या भव्य निर्धार मेळाव्यात प्रचंड संख्येने सामील होण्याचे आवाहन हे यावेळी वडकुते यांनी केली.

    यावेळी मुजीब मुजावर, बिरुदेव खरात, गणेश गावडे, औदुंबर वाघमोडे, गणेश खरात, ज्ञानेश्वर भोसले, हनुमंत मदने, अक्षय वाघमोडे, सागर गाढवे, सचिन माने, प्रशांत गाढवे, सुनील गाढवे, ओंदुंबर वाघमोडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.