जिल्हा परिषदेत असणार ५०टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती; जुन्या यादीतील कर्मचाऱ्यांना कोरोना सेंटर ड्यूटी

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जि.प. प्रशासनाने कडक धोरण हाती घेतले आहे. गावपातळीसह पंचायत समिती, जि.प.मुख्यालय स्तरावर प्रवेशबंदी केली आहे. विनामास्क मोकाट फिरणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. १ लाख ३० हजार पर्यंतचा दंड मंगलकार्यालय, दुकानदार, आणि विना मास्क फिरणाऱ्यांवर आकारण्यात आला आहे. कारवाई करतेवेळी वाद घालून प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्यां विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

  सोलापूर: कोरोना प्रार्दूभाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेत ५०टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे जि.प. प्रशासनानी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची रुपरेषा काढण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर शहरातील कोरोना परिस्थितीजन्य महानगर पालिकेनी कोरोना केअर आणि कोरोना सेंटरसाठी जि.प.च्या कर्मचाऱ्यांची मागणी प्रस्तावित केली आहे. जिल्हा परिषदेतील केअर सेंटरसाठी कामकाज केलेल्या जुन्या यादीतील कर्मचाऱ्यांची नावे देण्याची तयारी जिल्हा परिषदेनी दर्शविली आहे.

  याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार ५०टक्के कर्मचारी उपस्थिती बाबत सीईओ दिलीप स्वामी आणि सामान्य प्रशासनाची बैठक घेण्यात आली. कर्मचाऱ्यांना पुर्ण वेळ सुट्टी न देता अर्धवेळासाठी बोलविण्यात यावेत असा निष्कर्ष बैठकीत काढण्यात आला. मार्च अखेर असल्याने पुर्ण वेळ सुट्टी देणे हे संयुक्तीक ठरत नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदीन अर्धवेळ कामकाज देण्याचा निर्णय प्राथमिक स्वरूपात घेण्यात आला. शहरातील कोरोना रूगणांची संख्या पाहता मनपा आयुक्त शिवशंकर यांनी जि.प. कर्मचारी कोरोना केअर सेंटरसाठी देण्यासाठी मागणी प्रस्तावीत केली आहे. या मागणी वर आदयप पर्यंत शिक्का मोर्तब करण्यात आला नाही. शहरा पाठोपाठ ग्रामीण क्षेत्रात कोरोना रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमी जि.प.च्या आरोग्य विभागाने केअर सेंटरसाठी वाढीव कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. त्यामूळे जि.प. आणि मनपा पून्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या मागणीवरून आमने सामने येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जि.प. प्रशासनाने कडक धोरण हाती घेतले आहे. गावपातळीसह पंचायत समिती, जि.प.मुख्यालय स्तरावर प्रवेशबंदी केली आहे. विनामास्क मोकाट फिरणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. १ लाख ३० हजार पर्यंतचा दंड मंगलकार्यालय, दुकानदार, आणि विना मास्क फिरणाऱ्यांवर आकारण्यात आला आहे. कारवाई करतेवेळी वाद घालून प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्यां विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

  कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टेस्टिंग यावर आम्ही सध्या भरलेले असून या कथा आवश्यक ते मनुष्यबळ उभारण्यात आले आहे गरज भासल्यास जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची भीती नियुक्ती केली जाईल सध्याच्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या पाहता पालिकेच्या मार्फत दोन कोविड सेंटर आणि एक क्वारंटाईन सेंटर चालू आहेत ,पुढील काही दिवसात शहरातील वाढती कोरोना संख्या लक्षात घेऊन कोविड केंद्राची संख्या वाढविण्यात येईल.- महानगर पालिका आयुक्त शिवशंकर

  ५०टक्के कर्मचारी उपस्थिती संदर्भात सीईओंशी चर्चा करण्यात आली, सुट्टी देण्याऐवजी अर्धवेळ कामकाज कर्मचाऱ्यांना देण्याचा प्राथमिक निर्णय झाला आहे.महानगर पालिकेनी कोविड सेंटरसाठी जि.प.कर्मचाऱ्यांची मागणी केल्याची ऐकीव माहीती आहे. याबाबत अधिकृतपत्र आले नाहीत.
  परमेश्वर राऊत, उपमुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.