मोहोळ तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी बालाजी शेळके तर खजिनदारपदी ‘नवराष्ट्र’चे दादासाहेब गायकवाड

    मोहोळ : मोहोळ तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार बालाजी शेळके यांची निवड करण्यात आली. यासह सचिवपदी मधुकर पाटील, उपाध्यक्षपदी राम कांबळे, विष्णू शिंदे व खजिनदार पदी दादासाहेब गायकवाड यांच्या निवडी यावेळी करण्यात आल्या.

    मोहोळ तालुका पत्रकार संघाची वार्षिक बैठक ३० जून रोजी मातोश्री मीनाताई ठाकरे बालोद्यान येथे माजी अध्यक्ष भारत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

    यामध्ये मोहोळ तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जनसत्यचे पत्रकार बालाजी शेळके यांची एकमताने निवड करण्यात आली. यासह सचिवपदी जनमत चे मधुकर पाटील, उपाध्यक्षपदी सोलापूर भूषण चे राम कांबळे, लोकमत चे विष्णू शिंदे व खजिनदारपदी ‘नवराष्ट्र’चे तालुका प्रतिनिधी दादासाहेब गायकवाड यांच्या निवडी यावेळी करण्यात आल्या. निवडीनंतर मोहोळ तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष भारत नाईक व सर्व सदस्यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

    या बैठकीला माजी अध्यक्ष भारत नाईक, अशोक कांबळे, महेश कुलकर्णी, राजकुमार शहा, मदन कुलकर्णी, दिलीप देशपांडे, महेश सोवनी, गोरोबा कुंभार, संजय आठवले, देविदास नाईकनवरे, चंद्रकांत देवकते, सुहास घोडके, सम्मेद शहा, सुभाष शिंदे, किशोर मारकड, राजेश शिंदे, लक्ष्मण गुरव, राजकुमार बाळसराफ, अशोक पाचकूडवे, नासीर मोमीन, कैलास रणदिवे आदि सर्व दैनिकाचे पत्रकार बांधव व मोहोळ पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रस्तावना अशोक कांबळे यांनी केली. तर आभार प्रा. चंद्रकांत देवकते यांनी मानले.