जि.प सभागृहात आयत्यावेळेच्या विषयाला बंदी ; अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांचे फर्मान

-सदस्यांच्या प्रश्नाना अध्यक्ष घाबरत असल्याचा राष्ट्रीवादी काँग्रेसचा आरोप

    सोलापूर : जिल्हा परिषदेच्या स्थायी आणि सर्वसाधारण सभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या आयत्या वेळेच्या विषयाला अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांनी बंदी घालण्याचे फर्मान सभागृह सचिव डेप्यूटी सीईओ परमेश्वर राऊत यांना दिले आहेत. अध्यक्षांच्या या फर्मानामुळे सदस्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अध्यक्ष घाबरत असल्याचा आरोप राष्ट्रीवादी काँग्रेस कडून करण्यात येत आहे.

    याबाबात मिळालेली माहिती अशी की, अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांनी स्थायी आणि सर्वसाधारण सभा आयोजित करताना सभेमध्ये चर्चेसाठी विषयपत्रिका सभा नोटीस देतेवेळी विषय निश्चित करण्यात आलेले असतात. आणि सभेदरम्यान अचानकपणे सादर केले जातात त्यामूळे आयत्यावेळेचा आशय समजून येत नाही.स्थायी आणि सर्वसाधारण आयोजित सभेच्या ५ दिवस अगोदर विषय देण्याचे सर्व विभाग प्रमूखांना पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे.शुक्रवारी अध्यक्षांच्या पत्रामूळे सदस्यांमध्ये तर्कविर्तक लढविण्यात आले. सभागृहात अनेक विषयांचा ऊहापोह होत असल्याने यावर येणाऱ्या बंदीमूळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

    -पळपुटेपणाचे लक्षण

    “सभागृहातील आयत्या विषयांना अध्यक्ष अनिरूध्द कांबळे घाबरतात समाधानकारक उत्तरे देण्या ऐवजी भ्रष्टकारभाराला पाठींबा देत आहेत. अध्यक्षांचे हे पळपुटेपणाचे लक्षण आहे.”

    -उमेश पाटील ( सदस्य जि.प.)

    -पाच दिवस अगोदर विषय दया

    “स्थायी आणि सर्वसाधारण सभेत अचानकपणे आयत्यावेळेचे विषय मांडण्यात येतात त्यामूळे गोंधळ निर्माण होतो. सभेच्या पाच दिवस अगोदर विषय देण्यात यावे आशी सुचना सभागृह सचिवांना केली आहे.”

    -अनिरुध्द कांबळे ( अध्यक्ष जि.प.)