बार्शीत कोरोना रुग्णाची विलगीकरण कक्षात गळफास घेऊन आत्महत्या

    बार्शी : येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका करोनाबाधित इसमाने विलगीकरण केंद्रातच गळफास लावून आत्महत्या केली आहे. मानसिक तणावातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

    दरम्यान चिखर्डे या गावची ही आत्महत्या केलेली व्यक्ती आहे. उमेश भागवत कोंढारे असे या व्यक्तीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी उमेश कोंढारे आणि त्यांच्या कुटुंबातील आई, पत्नी आणि दोन मुले कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे बार्शीतील पॉलीटेक्निक येथे असलेल्या विलगीकरणात ठेवले होते.

    कोंढारे यांनी आज सकाळी फाशी घेतल्याचे तेथील कर्मचा-यांना समजले. दरम्यान त्यावेळी कर्मचा-यांनी बार्शी पोलीसांना कळविले. अजून फाशी का घेतली याचे कारण समजले नाही, मात्र कोरोना रुग्णांना पाहून अस्वस्थ झाल्याने कोंढारे यांनी आत्महत्या केली, अस बोलले जाते.