लग्न करतायं?सावधान ! जि.प.मूख्यालयात प्रवेशबंदी ; सीईओ स्वामी यांचे आदेश जारी

सोलापूर शहर जिल्हयात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर आहे.मार्च अखेरचे निमित्त समोर करुन ठेकेदारांची वरदळ मुख्यालयात वाढली आहे. त्यामूळे खबरदारीचा उपाय म्हणून सीईंओंनी आदेश जारी केले आहेत. यामध्ये जि.प.च्या आजी माजी सदस्यांसह लोक प्रतिनीधीना सुट देण्यात आली आहे. विवाह सोहळा, अंत्ययात्रा, सार्वजनीक उत्सव , यात्रा, आठवडा बाजार, यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर पोलिस प्रशासनास गटविकास अधिकाऱ्यांची करडी नजर असणार आहे. गावपातळीवर कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

    सोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात लग्न करतायं तर सावधान , ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी यांनी कडक धोरण हाती घेतले आहे. याशिवाय जि.प.मुख्यालयात विनाकारण फिरणाऱ्यांना प्रवेश बंदी करण्याचा आदेश सीईओंकडून जारी करण्यात आला आहे.

    सोलापूर शहर जिल्हयात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर आहे.मार्च अखेरचे निमित्त समोर करुन ठेकेदारांची वरदळ मुख्यालयात वाढली आहे. त्यामूळे खबरदारीचा उपाय म्हणून सीईंओंनी आदेश जारी केले आहेत. यामध्ये जि.प.च्या आजी माजी सदस्यांसह लोक प्रतिनीधीना सुट देण्यात आली आहे. विवाह सोहळा, अंत्ययात्रा, सार्वजनीक उत्सव , यात्रा, आठवडा बाजार, यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर पोलिस प्रशासनास गटविकास अधिकाऱ्यांची करडी नजर असणार आहे. गावपातळीवर कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

    जि.प. प्रशासनाने प्रतिबंधक उपायासाठी जिल्हयातील अधिकाऱ्यांची मोठी कार्यशाळा घेतली असून प्रतिबंधीतक्षेत्रासाठी टास्क फोर्सची निर्माती करण्यात आली आहे. या टास्क फोर्समध्ये जि.प.च्या विभाग प्रमूखांना महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ग्रामीणभागातील दुकानदार यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. मास्क सॅनिटायझर अनिवार्य करण्यात आले आहे. मर्यादेपेक्षा जास्त लोक हॉटेल, बार, रेस्टॉरंट , मंगलकार्यालयात आढळल्यास परवाना रध्दची कारवाई करण्यात येणार आहे.