ऑनलाईन बुकींग पासची गरज नाही; फक्त आयकार्ड दाखवून मिळणार विठूरायाचे दर्शन 

पंढरपूर विठ्ठल मंदिरात ऑनलाईन बुकींग पासची सक्ती केली जाणार नाही. २० जानेवारीपासून ओळखपत्र दाखवून दर्शन मिळणार आहे. त्यामुळे आता दर दिवशी ८००० भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे.

पंढरपूर : विठूरायाच्या दर्शनासाठी आता ऑनलाईन बुकींग पासची गरज नाही. फक्त आयकार्ड दाखवून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीने नियमावलीत काहीसा बदल करत महत्वाच निर्णय घेतला आहे.

पंढरपूर विठ्ठल मंदिरात ऑनलाईन बुकींग पासची सक्ती केली जाणार नाही. २० जानेवारीपासून ओळखपत्र दाखवून दर्शन मिळणार आहे. त्यामुळे आता दर दिवशी ८००० भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे.

महत्वाचं म्हणजे मकर संक्रांतीलाही दर्शन सुरूच राहणार आहे. मात्र, या दिवशी महिलांना ओवसायला बंदी घालण्यात आली आहे.
कोरोना नियमानुसार दहा वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील भाविकांना प्रवेश नाही, अशी माहिती मंदिर समिती सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.