‘पारंपारिक पद्धतीने दहीहंडी साजरी करू द्यावी, अन्यथा…’; भाजप नेते आशिष शेलार यांचा इशारा

पारंपारिक पद्धतीने दहीहंडी साजरी करू द्यावी. व्यावसायिक किंवा अन्य दहीहंडी यांना परवानगी नसावी. परंतु दहीहंडी झाली पाहिजे

    सोलापूर : पारंपारिक पद्धतीने दहीहंडी साजरी करू द्यावी. व्यावसायिक किंवा अन्य दहीहंडी यांना परवानगी नसावी. परंतु दहीहंडी झाली पाहिजे, असे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री तथा विधानसभेचे मुख्य प्रतोद आमदार ऍड. आशिष शेलार यांनी दिला.

    ऍड. आशिष शेलार यांचे सोलापूरात भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, माजी सभागृहनेते संजय कोळी, नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक किरण देशमुख, बिज्जू प्रधाने, अजित गायकवाड, राजकुमार पाटील, राजाभाऊ काकडे, समाधान आवळे, राजाभाऊ आलूरे यांच्यासह इतर उपस्थित होते.

    यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला आशिष शेलार यांनी दिलखुलास उत्तरे दिली. अशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या काळामध्ये लोकांचे जीवन सुरक्षित नाही. जनतेचे सुरक्षेऐवजी मंत्र्यांच्या मुलांचे संरक्षण वाढले आहे. महिलांचे अत्याचार वाढले आहेत, कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. पोलिसांवर सरकारचा वचक नसून, आपापसात गटबाजीमुळे अनेक सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.

    महाविकास आघाडीवर टीका करत पुढे म्हणाले, पारंपारिक पद्धतीने दहीहंडी साजरी करू द्यावी. व्यावसायिक किंवा अन्य दहीहंडी यांना परवानगी नसावी. परंतु दहीहंडी झाली पाहिजे, असे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेलार यांनी दिला. यावेळी आशिष शेलार यांच्या सोलापूर शहर जिल्ह्याच्या दौऱ्यामुळे भाजपमध्ये नवचैतन्याची लाट दिसून आली.