ही राष्ट्रवादी पवार साहेबांच्या विचारांची राहिली नाही; चित्रा वाघ यांची टीका

    अकलूज/कृष्णा लावंड : नागरिकांचे हित कधी पवार साहेबांनी डावलले नाही किंवा नागरिकांच्या हिताच्या कामात त्यांनी कधी राजकारण आणले नाही. आजच्या राष्ट्रवादीत नीतीमूल्यांचा ऱ्हास झाला. ही राष्ट्रवादी शरद पवारांची राहिली नसून आता इथे दुसऱ्यांचेच हुकूम चालत आहेत, अशी घणाघाती टीका भाजप महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अकलूज येथे केली.

    अकलूज नगर परिषद व नातेपुते नगर पंचायत व्हावी, यासाठी गेल्या सहा दिवसांपासून प्रांत कार्यालयाबाहेर तीन गावच्या नागरिकांचे साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणाला भेट देण्यासाठी चित्रा वाघ अकलूज येथे आल्या होत्या. वाघ पुढे म्हणाल्या, प्रशासकीय मंजूरीत प्राथमिक टप्प्यात असणाऱ्या गावांना नगर परिषदेची मंजूरी दिली जाते. बारामती तालुक्यातील गावाला नगर परिषदेची मंजुरी मिळते. पण माळशिरस तालुका मोहीते पाटलांचा, भाजपचा म्हणून इथल्या गावांची मंजूरी अङवली जाते. राष्ट्रवादीचे हे राजकारण नागरिकांच्या विकासाला मारक आहे. तुम्ही कितीही राजकीय खेळ खेळा. पण सोलापूर जिल्ह्यात तुमची ङाळ शिजणार नाही. अधिवेशनाचा कालावधी वाढवला तर विरोधी पक्ष फाङून खातील म्हणून यांनी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचा ठेवला आहे. कोरोनाच्या नावाखाली ब-याच गोष्टी पुढे ढकलल्या आहेत.

    इथले पालकमंत्री दत्तामामा यांनी अद्याप उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या अङचणी विचारल्या नाहीत. स्वतःला मामा म्हणवून घेणाऱ्या दत्तामामांना अकलूज व नातेपुतेच्या बहिणींची जराही काळजी वाटत नाही. जर तुम्हाला आमच्या घरापर्यंत यायला जमत नसेल तर आम्ही आंदोलनाच्या मार्गाने तुमच्या दारापर्यंत येऊ असा इशारा चिञा वाघ यांनी दिला.

    राजकारणाच्या खेळात जनतेला भरङु नका असे आवाहन करत जि. प. सदस्या शितलदेवी मोहीते पाटील यांनी शासनावर कङाङुन टिका केली. तर विधान परिषदेच्या निवङणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव होईल म्हणुन राष्ट्रवादीने अकलूज व नातेपुतेची मंजुरी अङवून ठेवल्याची टिका आमदार राम सातपुते यांनी केली.

    यावेळी आमदार रणजितसिंह मोहीते पाटील, भाजपाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहीते पाटील, वैष्णवीदेवी मोहीते पाटील, फातिमा पाटावाला, सुनंदा फुले, पायल मोरे भाजप तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर,संदीप घाडगे हमिद मुलाणी मुक्तहार कोरबु महादेव कावळे  जि.प. सदस्य, ग्रा. पं. सदस्य व शेकङोंच्या संख्येने महीला व पुरुष उपस्थित होते.