Incoming NCP continues; BJP office bearers from Navi Mumbai join NCP

अवघ्या दोन वर्षांतच कल्याणराव काळे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावरुन मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता, अशी टोलेबाजीही कल्याणरावांनी केली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

    पंढरपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये भाषण केले. या प्रचारसभेत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

    अवघ्या दोन वर्षांतच कल्याणराव काळे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावरुन मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता, अशी टोलेबाजीही कल्याणरावांनी केली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

    विठ्ठल परिवार एकत्र असला पाहिजे. भविष्यात परिवाराची ताकद विरोधकांना दाखवली पाहिजे. परिवार एकत्र आला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती. मधल्या काळात माझा ट्रॅक चुकला होता. आता जिल्हा सगळा राष्ट्रवादीमय करणार. पवार साहेबांची ताकद कायम स्वरुपी आमच्या पाठीशी असते. इथून पुढच्या काळात कायम स्वरूपी राष्ट्रवादीचे काम करणार असल्याचे काळे म्हणाले.