भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर दगडफेक; कुणालाही दगड लागला नाही म्हणून, नाही तर…

सोलापुरातील श्री शैल्य हक्क महादेव मंदिर परिसरात पडाळकर यांच्या कारवर दगडफेक झाली. या दगडफेकीत पडळकर यांच्या कारच्या काच फुटल्या आहेत. सुदैवाने कारमध्ये बसलेल्या कुणालाही दगड लागला नाही. मात्र, या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    सोलापूर : भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर दगडफेक झाली आहे. ओबीसी आरक्षण जनजागृतीसाठी ते दौरे करत आहेत. यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापुरात आले असताना हा दगडफेकीचा प्रकार घडला. (BJP MLA Gopichand Padalkar’s car was stoned, incident in Solapur)

    सोलापुरातील श्री शैल्य हक्क महादेव मंदिर परिसरात पडाळकर यांच्या कारवर दगडफेक झाली. या दगडफेकीत पडळकर यांच्या कारच्या काच फुटल्या आहेत. सुदैवाने कारमध्ये बसलेल्या कुणालाही दगड लागला नाही. मात्र, या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    घोंगडी बैठक संपल्यावर बाहेर पडताच अचानक दगडफेक झाली. वैचारिक लढाई तर विचाराने चाला. पण अशाप्रकारे उत्तर देणार असतील तर मी कधी गप्प बसणार नाही. आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील मात्र, मी माझ्या भूमिकेवर कायम ठाम राहणार असल्याची प्रतिक्रिया पडाळकर यांनी दिली.