भाजपच्या आमदारांचा युवासेनेकडून निषेध

युवासेना तालुका प्रमुख गणेश इंगळे व युवासेना अकलुज शहर प्रमुख शेखर खिलारे यांच्या नेतृत्वाखाली संगम या ठिकाणी करण्यात निषेध करण्यात आला. निषेधार्थ युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गाढवांच्या गळ्यात भाजपच्या १२ आमदारांचे फोटो अडकवून तीव्र निषेध नाेंदविला.

    अकलुज : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाेंधळ घालून सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पाेहचविणाऱ्या भाजपच्या बारा आमदारांचा युवासेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपच्या बारा आमदारांनी विधान भवनात माईक हिसकावण्याचा व राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षांना आरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ केली. महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. आजपर्यंत अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच घडली नाही, असे युवासेनेने म्हटले आहे. या घटनेचा युवासेना तालुका प्रमुख गणेश इंगळे व युवासेना अकलुज शहर प्रमुख शेखर खिलारे यांच्या नेतृत्वाखाली संगम या ठिकाणी करण्यात निषेध करण्यात आला. निषेधार्थ युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गाढवांच्या गळ्यात भाजपच्या १२ आमदारांचे फोटो अडकवून तीव्र निषेध नाेंदविला.

    यावेळी समीर शेख, दत्ताभाऊ साळुंखे, प्रशांत पराडे, अर्जुन लावंड, रोशन पराडे, कल्याण इंगळे, ऋषिकेश पराडे, संजय पराडे, युवराज पवार, शंभू पराडे, राहुल महाडिक, गणेश पराडे, सौदागर पराडे, दयानंद इंगळे, विकी मुळे व अनेक युवासैनिक उपस्थित होते.