केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा, युवा सेनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे शिवसेनेचे कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य व वादग्रस्त असे विधान केले आहे.

    सोलापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा राज्यभरात निषेध नोंदविण्यात येत आहे. सोलापुरातील युवा सेनेच्यावतीनेसुद्धा नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन करून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन शहर युवा अधिकारी विठ्ठल वानकर  यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्यावतीने  देण्यात आले.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे शिवसेनेचे कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य व वादग्रस्त असे विधान केले आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत . राज्यात त्यांना एकप्रकारची प्रतिष्ठा आहे. शिवाय नारायण राणे हेसुद्धा मंत्री आहेत . असे असताना राणे यांनी जाणीवपूर्वक व प्रसिद्धी स्टंट म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा युवा सेनेच्यावतीने निषेध करीत बेताल नारायण राणे यांच्याविरुद्ध कलम १५३,१८९,५०४,५०५ ( २ ) व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी शहर युवा सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

    पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन देताना उपजिल्हा युवा अधिकारी बालाजी चौगुले,अमर बोडा,जिल्हा चिटणीस योगेश भोसले,तालुका समन्वयक प्रसाद नीळ ,अरुण जाधव,मनोहर दोंतुल आदी उपस्थित होते.