सोलापूर जिल्ह्यात जलपुनर्भरण अभियान राबवा ; भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाचे संचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे आवाहन

सोलापूर जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतींनी शासकीय इमारती मध्ये जल पुनर्भरण साठी आराखड्यातील कामासाठी १५ वा वित्त आयोग मधील निधी वापरावा. याबाबत ग्रामपंचायती निहाय आढावा घेणेत येईल. अंदाजपत्रके, प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता घेणेत याव्यात. पाऊस निघून गेलेनंतर काही उपयोग होणार नाही. वेळेत कामे पुर्ण करा. दर्शनी भागात कामे सुरू करा. कारण शेतकरी यांना पाहता येतील. त्याचा आदर्श घेऊन ते पुढील कामे करतील.

    सोलापूर : राज्यात १ लाख विद्यार्थी यांना जल पुनर्भरण साठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्हात जल पुनर्भरण अभियान प्रभावी पणे राबवा असे आवाहन राज्याच्या भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाचे संचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. सोलापूर जिल्हा परिषद येथे आज जिल्ह्यातील गटविकास अधिकारी तसेच भुजल सर्वेक्षण विभाग तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची आॅनलाईन बैठक घेऊन मार्गदर्शन केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे होते. या प्रसंगी भुजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भुवैज्ञानिक मुश्ताक शेख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते.

    राज्यात १ लाख विद्यार्थी यांना जल पुनर्भरण साठी प्रशिक्षण – डाॅ. कलशेट्टी

    राज्यात १ लाख विद्यार्थी यांना जल पुनर्भरण साठी प्रशिक्षण देणेत येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात किमान सहा हजार विद्यार्थी या मघ्ये सहभागी होत आहेत. येत्या १६ जुलै पर्यंत जल पुनर्भरण मोहिम सुरू राहणार आहे. या मोहिमेत पाण्याच्या जागृतीसाठी कलाकारांचा सहभाग घेणेत येत आहे.

    सर्व शासकीय कार्यालये व माध्यमिक शाळांमध्ये जलपुनर भरण करणे साठी नियोजन करणेचे सुचना डाॅ. कलशेट्टी यांनी दिल्या.
    ग्रामपंचायतीचा १५ वा वित्त आयोग मध्ये पाणी व स्वच्छतेसाठी साठी निधी राखीव ठेवणे बाबत सुचना देणेत आलेले आहेत. आराखड्या मध्ये ज्या ग्रामपंचायतींना जसं पुनर्रभरण ची कामे घेतली आहेत त्यांना प्रभावी पणे राबवावी. तर पाऊस पाणी संकलनाच्या कामासाठी लोकसहभाग घ्या. असे आवाहन संचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले. स्वच्छतेप्रमाणे पाण्याची चळवळ उभी करा असे आवाहन केले.

    सोलापूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणाचे काम समाधानकारक

    सोलापूर जिल्हयात संपर्कातील व्यक्तींचा शोध वेळेत घेऊन तपासणी केल्यामुळे कोरोना नियंत्रणात आला. सिईओ दिलीप स्वामी यांनी सुरू केलेल्या माझे गाव कोरोना मुक्त गाव अभियानाचे कौतुक करून यामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी झटून काम केल्याचे संचालक डाॅ. कलशेट्टी यांनी सांगितले. जल पुनर्भरण मुळे शेतकरी बांधवांना चांगला फायदा होणार आहे. पावसाचा थेंब अन् थेंब जमिनीत मुरविला तरच भुजल पातळी वाढणेस मदत होणार आहे.

    जल पुनर्भरण ग्रामपंचायतींना बंधनकारक : सीईओ दिलीप स्वामी
    सोलापूर जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतींनी शासकीय इमारती मध्ये जल पुनर्भरण साठी आराखड्यातील कामासाठी १५ वा वित्त आयोग मधील निधी वापरावा. याबाबत ग्रामपंचायती निहाय आढावा घेणेत येईल. अंदाजपत्रके, प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता घेणेत याव्यात. पाऊस निघून गेलेनंतर काही उपयोग होणार नाही. वेळेत कामे पुर्ण करा. दर्शनी भागात कामे सुरू करा. कारण शेतकरी यांना पाहता येतील. त्याचा आदर्श घेऊन ते पुढील कामे करतील.

    या प्रसंगी वरिष्ठ भुवैज्ञानिक मुश्ताक शेख यांनी सोलापूर जिल्ह्यातील भूजल पाणी पातळी वाढवण्यास भूजल पुनर्भरण करणे साठी विहीर, विंधन विहीर पुनर्भरण व छतावरील पाऊस पाणी संकलन संकल्पना आणि तंत्रज्ञान यावर सादरीकरण केले.