अवैध विक्रीसाठी घेऊन जात असलेली दारु पकडली ; अकलूज पोलीसांची कारवाई

अवैधरीत्या विक्रीसाठी घेऊन जात असलेली दारु अकलूज पोलीसांनी पकङली असून या कारवाईत सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    अकलूज : अवैधरीत्या विक्रीसाठी घेऊन जात असलेली दारु अकलूज पोलीसांनी पकङली असून या कारवाईत सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    याबाबत सविस्तर माहीती अशी की, दिनांक २९/०५/२०२१ रोजी पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांना, अकलुज ते टेभुर्णीकडे जाणारे रोडवर जुने एस टी स्टैंड चौकात चारचाकी वाहनामध्ये अवैध दारु घेऊन जात असलेबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागिय पोलीस अधिकरी नीरज राजगुरु, पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी एएसआय बाळासाहेब पानसरे, पोहेकॉ रामचंद्र चौधरी, पोहेकॉ सुहास क्षिरसागर, पोहेकॉ मंगेश पवार, पोहेकॉ विक्रम घाटगे, पोना निलेश काशिद, पोकॉ नितीन लोखंडे हे खाजगी मोटार सायकल वरून जुने एस टी स्टॅड येथे गेले असता सदाशिव अजय मराठे, वय २५ वर्षे रा. निमगांव टें. ता. माढा हा त्याचेकडील सिलव्हर रंगाच्या मारुती स्वीप्ट कार नंबर एम एच १४/एफसी ००३६ यामध्ये ७ हजार ४८८ रू देशी दारू टॅगो पंच कंपनीच्या १८० मीलीच्या एकूण १४४ सीलबंद बाटल्या प्रत्येकी किं.५२/- रू प्रमाणे, ६२ हजार ४०० रू देशी दारू सुपर संत्रा कंपनीच्या १८० मीलीच्या एकूण १ हजार २०० सीलबंद बाटल्या प्रत्येकी किं. ५२ रु प्रमाणे, १४ हजार ४०० मॅकडॉल नंबर १ व्हिस्की कंपनीच्या १८० मीलीच्या एकूण ९६ सीलबंद बाटल्या प्रत्येकी किं. १५० रु प्रमाणे असा एकुण देशी विदेशी दारुच्या १ हाजार ४४० बाटल्या एकुण किंमत ८४ हजार २८८ रुपये चा प्रोव्हि. माल व ४ लाख ७० हजार किंमतीची मारुती स्विफ्ट कार असा एकुण ५ लाखा ५४ हजार २८८ चा माल जप्त केला आहे. त्याबाबत पोना नितीन हरीदास लोखंडे यांनी अकलुज पोलीस ठाणे यांनी दिलेले फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोना विलास माने हे तपास करीत आहेत.