‘गाव तिथे कोविड सेंटर’ उपक्रमांतर्गत सीईओ स्वामी यांनी साधला गाव कारभाऱ्यांशी संवाद

स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम प्रमुख सचिन जाधव यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत सर्व सरपंच व ग्रामसेवक यांचे मार्गदर्शन केले.व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये यावेळी सीईओ स्वामी यांच्याबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितल कुमार जाधव, प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. इरफान सय्यद. स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम प्रमुख सचिन जाधव आदी उपस्थित होते.

  आज मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ज्या गावची लोकसंख्या ५००० किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा गावच्या सरपंच, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी सीईओ स्वामी म्हणाले केवळ कर्तव्य न समजता मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून कोविडच्या महामारी च्या काळात आपल्या गावासाठी मोठे कार्य करण्याची संधी चालून आली आहे. या संधीचा फायदा घेऊन गावातील लोकांचे प्राण वाचवण्याचे पुण्याचे काम आपणास करावे लागणार आहे. या काळात लोकांसाठी आपण जेवढे करू तेवढे कमीच आहे. मोठे आंतरिक समाधान या सेवा रुपी कामाने आपणास मिळणार आहे.

  दिलीप स्वामी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये दिलेल्या सूचना

  -५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी पुढाकार घेवून खालील बाबी कराव्यात

  -गावात सभागृह हॉल निश्चित करावा, तेथे संडास बाथरूम व पाण्याची व्यवस्था करावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी दिवाबत्ती व्यवस्था करावी

  -सदर जागेचे स्थळ निरीक्षण करावे व वरील व्यवस्था करावी

  -या ठिकाणी आपल्या ला CCC कोविड केअर सेंटर स्थापन करायचे आहे जेथे लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले Positive रुग्ण दाखल करायचे आहेत. याचा महत्वाचा फायदा म्हणजे त्यांची गावातच सोय होईल घरचे जेवण मिळेल डॉक्टरांच्या देखरेखी खालील रहातील
  जाण्या येण्याचा खर्च वाचेल लक्षणे गंभीर झाल्यास लगेच पुढे DCHC व DCH ला संदर्भ सेवा देता येईल, यासाठी गावातील डॉक्टरांच्या सेवा घ्याव्या…त्यांना विनंती करून त्यांचे सेवेचे वेळापत्रक तयार करावे.

  -औषधे जिल्हा परिषद पुरवेलगावातील दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्था यांचेकडून जेवण किंवा इतर आवश्यक वस्तू साहित्य घेता येईल यासाठी त्यांना आवाहन करावे.या सर्व बाबांसाठी सरपंच ग्रामसेवक व सदस्यांनी पुढाकार घ्यावा.

  यावेळी मोहोळ तालुक्यातील आष्टी गावचे सरपंच डॉ. व्यवहारे यांनी मी स्वतः डॉक्टर या नात्याने माझ्या गावच्या कोविड सेंटर मध्ये रुग्णसेवा करण्यास तयार आहे. जिल्हास्तरावरून मला फक्त औषधांची सोय करावी, असे सांगितले.

  -यावेळी स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम प्रमुख सचिन जाधव यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत सर्व सरपंच व ग्रामसेवक यांचे मार्गदर्शन केले.व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये यावेळी सीईओ स्वामी यांच्याबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितल कुमार जाधव, प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. इरफान सय्यद. स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम प्रमुख सचिन जाधव आदी उपस्थित होते.