सीईओ स्वामी यांचा भ्रष्टाचाराला पांघरूण, वादग्रस्त फाईलीत नुसतीचं चमकोगिरी ; सदस्य फोडणार डरकाळी

संपूर्ण प्रकरणाची दखल सीईओ दिलीप स्वामी यांनी घेतली आहे. अर्थिक व्यवहारात शासनाच्या निकषांनुसार खरेदी करण्यात आली आहे ? सबंधीत लिपीकांनी फाईल सादर केली होती का ? परस्पर अधिकाऱ्यांनी फाईल तयार केली आहे. अशा विविध प्रश्नाची प्राथमिक पडताळणी करण्यात आली आहे.

    सोलापूर : जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागातील १कोटी १९लाख ६० हजार रक्मेच्या व्यवहारात भ्रष्टाचार झालेल्या फाईलीला सीईओ दिलीप स्वामी पांघरून घालत असल्याचा आरोप सदस्यांकडून करण्यात येत आहे. गायब करण्यात आलेल्या फाईलीवरुन लपवा छपवी का ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दिलीप स्वामी हे नुसतेचं चमकोगिरी करत असल्याचा सदस्यांनी संताप व्यक्त केला आहे. स्वच्छता विभागात बंद कपाटा मध्ये फाईल दडल्याची तेथील कर्मचाऱ्यांनी माहीती दिल्याने कपाट उघडण्यात आले.

    प्रारंभी कपाटाच्या चावी वरून बनवाबनवी करित असल्याची बाब सीईओ यांच्या निर्देशनास आल्यावर सीईओ स्वामी यांनी कारवाई न करता भ्रष्टाचाराला पाठींबा दिला का ?. या प्रश्नवरून सदस्यांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. ६ मे रोजी होणाऱ्या ऑनलाईन सर्व साधारण सभेत भ्रष्ट कारभारा विरोधात सदस्य डरकाळी फोडणार आहेत.याबाबत माहीती आशी की, जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी विभागाच्या वतीने जनजागृती करिता स्टीकर खरेदीत अर्थिक व्यवहारामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचे पत्र सामान्य प्रशासन डेप्यूटी सीईओ परमेश्वर राउत यांनी पत्र दिले आहे.

    स्वच्छता विभाग प्रमूख गोरख शेलार हे रजेवर होते. त्यांचा पदभार राऊत यांच्याकडे ५ ते १९ एप्रिल पर्यंत सोपविण्यात आला होता. या कालावधीत कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून राऊत यांना प्राप्त माहीतीनुसार आक्टोबंर २०१९ सालात १ कोटी १९ लाख ६० हजारांची ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी स्टीकर खरेदी करण्यात आले होते. पण खरेदी व्यवहारात फाईलवर संशायस टिप्पण्या लिहण्यात आल्या आहेत. टिपण्या लिहताना संबंधीत लिपीकांचा कोठे ही उल्लेख आढळला नाही. थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहया एकाच दिवशी दाखविण्यात आल्या आहेत. एका कर्मचाऱ्याकडे या फाईलीची झेरॉक्स उपलब्द असल्याने हा घोटाळा उघडकीस आला असे डेप्यूटी सीईंओ राऊत यांचं म्हणणं आहे. या संदर्भात त्यांनी सीईओ दिलीप स्वामी यांना हि बाब निर्देशनास आणून दिली आहे.स्टीकर खरेदी करणाऱ्यांवरून मोठे वादळ जि.प.च्या सर्वसाधारण सभेत निर्माण झाले होते. भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्याची मागणी सभागृहात सदस्य उमेश पाटील,त्रिभूवन धाईंजे ,आनंद तानवडे यांनी केली होती. संशयास्पद व्यवहारावर चौकशी समिती नेमण्यात आली होती. मात्र चौकशी समितीने निकाल काय लावला अथवा अर्थिक देवाण घेवाणमूळे कारवाई थांबवली का ? असा सवाल सदस्य उपस्थित करित आहेत.

    दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची दखल सीईओ दिलीप स्वामी यांनी घेतली आहे. अर्थिक व्यवहारात शासनाच्या निकषांनुसार खरेदी करण्यात आली आहे ? सबंधीत लिपीकांनी फाईल सादर केली होती का ? परस्पर अधिकाऱ्यांनी फाईल तयार केली आहे. अशा विविध प्रश्नाची प्राथमिक पडताळणी करण्यात आली आहे.