सीईओ स्वामी यांची ‘ऑन दी स्पॉट’ कारवाई ;  बेजबाबदार दुकानदारांचे धाबे दणाणले

प्राथमिक आरोग्य केंद्र कोंडी येथे भेट देऊन कोरोना लसीकरण सत्राची पाहणी केली. जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन ऑनलाइन शिक्षणा संदर्भात शिक्षकांशी संवाद साधला शाळेकडून राबवले जाणारे शैक्षणिक उपक्रम, शाळेतील बोलक्या भिंती यांचे सीईओ स्वामी यांनी कौतुक केले. अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन कमी पगारात कोरोना सारख्या महामारीत अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांनी अति उत्कृष्ट काम केल्याचे गौरवोद्गार यावेळी परमेश्‍वर राऊत यांनी काढले.

    सोलापूर : जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी यांनी ऑन दी स्पॉट कोरोना प्रतिबंधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.बेजबाबदार दुकानदारांचे धाबे दणाले. सीईओ स्वामी थेट गावात येऊन कारवाई करित असल्याने अनेकांची धावपळ उडाली.

    वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी गावभेट दौऱ्यावर आहेत. सीईओ स्वामी यांनी कोंडी येथे भेट देऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, गावचे सरपंच मंगल राठोड, उपसरपंच किसन भोसले,वैद्यकीय अधिकारी डॉ.बापट, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नीळ, प्रसाद नीळ, लक्ष्मण साबळे, मनोज निंबाळकर व ग्रामसेवक मारुती कांबळे आदी उपस्थित होते.यावेळी सीईओ यांनी प्रथम संपूर्ण गावात फेरी मारून गावातील स्वच्छता, दुकानांची व्यवस्था, आदींची पाहणी केली. यावेळी विना मास्क फिरणाऱ्या ग्रामस्थांना स्वामी यांनी खडे बोल सुनावले व मास्क घालण्यासंदर्भात सुचना करीत कारवाईचा बडगा उगारला.