महावितरणच्या वीज बिल वसुली विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्ह्याभर चक्काजाम आंदोलन

लॉकडॉउन कालावधीमध्ये नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हाताला कुठलंही काम नव्हतं.या कालावधीत नागरीकांना शेतकऱ्यांना आलेले भरमसाठ वीज बिल माफ करावे ही प्रमुख मागणी घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुर जिल्हात आठ ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.

    सोलापूर : सक्तीची वीजबिल वसुली थांबवा आणि लॉकडाऊन कालावधीतील तीन महिन्याचे घरगुती वीज बिल माफ करा तसेच थकित उसबील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सोलापूर जिल्ह्यात बार्शी,माढा,मोहोळ,पंढरपूर,टेंभुर्णी,डोणगाव,उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.

    लॉकडॉउन कालावधीमध्ये नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हाताला कुठलंही काम नव्हतं.या कालावधीत नागरीकांना शेतकऱ्यांना आलेले भरमसाठ वीज बिल माफ करावे ही प्रमुख मागणी घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुर जिल्हात आठ ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.या मागणीचा विचार न केल्यास भविष्यात उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी यांनी दिला.