चिंचणी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार

    सोलापूर : सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था पंढरपूर यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श शाळा हा पुरस्कार यावर्षी पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणीला देण्यात आला.

    चिंचणी येथील शाळेने ग्रामस्थांच्या सहकार्याने व शिक्षकांच्या कल्पकतेतून ही शाळा अतिशय सुंदर आणि डिजिटल बनवलेली आहे. ज्यामधून मुलांना पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम हा बोलक्या भिंतीवरून समजावा. त्याचबरोबर शाळेचा परिसर हा निसर्गरम्य असल्यामुळे या शाळेमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांची पटसंख्या दुपटीने वाढलेली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता यावर्षी दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार चिंचणी या शाळेला मिळालेला आहे.

    या पुरस्काराचे वितरण आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, शिक्षक नेते बाळासाहेब काळे, जि. प. सदस्य सुभाष राव माने यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी चिंचणी शाळेचे कौतुक केले.