झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी अकलूज व नातेपुतेचे नागरिक करणार उपोषण

    अकलूज : अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतीने नगरपंचायतीत रुपांतर होण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. परंतु राजकीय खेळी खेळणाऱ्या महाराष्ट्र सरकारकडून या दोन ग्रामपंचायतींची मंजुरी अडवून ठेवण्यात आली आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारचे ङोळे उघङण्यासाठी नगरपंचायतीची मंजुरी मिळेपर्यंत साखळी उपोषण करण्याचा निर्णय आज अकलूज व नातेपुते ग्रामस्थांकङून घेण्यात आला.

    राज्यातील इतर ग्रामपंचायतींना नगरपंचायतीत रुपांतर होण्यासाठी आघाङी सरकारकङून तातङीने मंजुरी मिळत आहे. परंतु अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतींची परवानगी मात्र अङवून ठेवण्यात आली आहे. हे सर्व राजकीय द्वेषापोटी करण्यात येत असल्याचे या दोन्ही गावच्या नागरिकांच्या लक्षात आले आहे. सरकारच्या विरोधात दाद मागण्यासाठी या दोन्ही ग्रामपंचायतींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्याचबरोबर आता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

    आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात येत्या शुक्रवार (दि. १८) तहसील कार्यालय माळशिरस येथे एक दिवसीय उपोषण करण्यात येणार असून, त्यानंतर नगरपंचायतीची परवानगी मिळेपर्यंत अकलूज येथील प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा निर्धार दोन्ही ग्रामपंचायतीच्या नागरीकांनी घेतला आहे.

    गेल्या सव्वा वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या दोन्ही ग्रामपंचायतींची कर वसूली थंङावली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारी थांबल्या. विकासकामे थांबली. ग्रामपंचायतींचा दररोजचा खर्च भागवणे अवघड झाले आहे. अशी बिकट अवस्था असताना महाराष्ट्र सरकार मात्र राजकीय ङावपेच खेळत आहे. राज्यातील इतर ग्रामपंचायतींना तातङीने नगरपंचायतींची परवानगी देत असताना माळशिरस तालुक्याकङे मात्र हेतूपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत आहे.

    अकलूज व नातेपुते ग्रामस्थांनी आज माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपा नेते धैर्यशील मोहिते -पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा त्यांच्यासमोर मांङली.

    यावेळी बाबाराजे देशमुख, बी. वाय. राऊत, अकलूजच्या सरपंच पायल मोरे, उपसरपंच शिवतेजसिंह मोहीते पाटील, धनंजय देशमुख, नातेपुतेच्या सरपंच कांचन लांङगे, उपसरपंच अतुल पाटील, माळेवाङीचे सरपंच जालींदर फुले, मामासाहेब पांढरे,  नितीन खराङे, क्रांतिसिंह माने पाटील, अकलूज व नातेपुते परीसरातील व्यापारी, शेतकरी, नागरिक उपस्थित होते.