जिल्हाधिकाऱ्यांनी सभेची परवानगी फेटाळली; जिल्हा परिषद सदस्यांचा अपेक्षाभंग

    सोलापूर : नवराष्ट्र : जिल्हा परिषद सदस्यांच्या आपेक्षभंग झाल्या आहेत. सोमवारी होणारी सर्वसाधारण सभा ऑनलाईनच घ्या असे म्हणत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी खुल्या सभागृहात सभा घेण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

    जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी 12 जुलै रोजी सर्वसाधारण सभा बोलवली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरासाठी तिसरा स्तर लागू केला आहे. त्यामुळे ही सभा खुल्या सभागृहात घेण्यास परवानगी द्यावी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव दिला होता. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी डेल्टा प्लसच्या संसर्ग भीतीमुळे खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनातील महत्त्वाच्या सर्व बैठका ऑनलाइन घेण्यात येत आहेत. त्याप्रमाणेच महापालिकेची सभा झाली आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभाही ऑनलाईन घ्यावी अशी सूचना केली आहे. त्यामुळे सोमवारी होणारी सभा ऑनलाईनच होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सांगितले. दरम्यान या पाशर्वभूमीवर सदस्यांचा हिरसमोड झाला आहे.