तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या : डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील

सोलापूर जिल्ह्यासह बार्शी तालुक्यात मागील दोन ते तीन महिन्यांपासून पाऊस पडत आहे. या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर येऊन हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाला फटका बसला आहे. हजारो शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली आहेत. ओढे-नाले, नद्या तुडूंब भरून वाहत आहेत.

    अकलुज : सोलापूर जिल्ह्यासह बार्शी तालुक्यात मागील दोन ते तीन महिन्यांपासून पाऊस पडत आहे. या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर येऊन हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाला फटका बसला आहे. हजारो शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली आहेत. ओढे-नाले, नद्या तुडूंब भरून वाहत आहेत.

    बार्शी तालुक्यात एकूण मंडळ 10 मंडल असून, यापैकी अगळगाव, उपले, गौडगाव, पांगरी, पानगाव, बार्शी या मंडलाचा अतिवृष्टीमध्ये समावेश केला आहे. परंतु याच तालुक्यातील वैराग, सूर्ड्डी, खांडवी, नारी या मंडलांना वगळून मंडलातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले आहे.

    बार्शी तालुक्यामध्ये संपूर्ण पावसाळ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण तालुक्यातील शेतीपिकाचे नुकसान झाले होते. परंतु शासनाने नुकसानभरपाईसाठी तालुक्यातील वैराग आणि सूर्डी, खांडवी, नारी मंडळ वगळले मुळे आहे. वैराग, खांडवी नारी आणि सुर्डी मंडळामध्ये सगळीकडे पाणीच पाणी आहे. सर्व नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन जास्त पावसामुळे वाया गेले आहे. तरी या चार मंडळावर शासनाने अन्याय केला आहे.

    याप्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन वैराग, सूर्ड्डी, खांडवी, नारी या मंडलाचा अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करून या मंडलातील सर्व गावातील युद्धपातळीवर पंचनामे करुन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकर्‍यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूसमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे दिले आहे.