महिला अधिकारी विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : अध्यक्ष कांबळे सभागृहाचे आवमान करतात, सदस्य धाईंजे यांचा आरोप

गरोदर माता आणि बालकांना महीलाबाल कल्याण विभागाकडून देण्यात येणाऱ्या पोषण अहारात अनियमित झाल्याचा आरोप सदस्य उमेश पाटील, त्रिभूवन धाईंजे, ज्योती पाटील यांनी लावून धरला आहे. सर्वसाधारण सभेच्या आरोपा नंतर सोमवारी झालेल्या स्थायी समिती सभेत पदभार काढण्यावरुन पडसाद उमटले.

  शेखर गोतसुर्वे , सोलापूर : जिल्हापरिषदेच्या महीलाबाल कल्याण कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांच्या विरोधात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सदस्य त्रिभूवन धाईंजे यांनी तक्रार दाखल केली आहे. जावेद शेख पदभारावरून अध्यक्ष अनिरुध्द कांबळे सभागृहाची दिशाभूल करुन फसवणूक करीत असल्याचा आरोप धाईंजे यांनी केला आहे. पोषण आहार वाटपात अनियमिता झाल्याने जावेद शेख यांचा पदभार काढून घेण्यात यावा आशी मागणी स्थायी समिती सभेत करण्यात आली आहे. चौकशी समितीचा आहवाल अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. चौकशी आहवाल येण्या अगोदरचं शेख यांना अध्यक्षाना क्लीनचीट दिल्यामूळे आम्ही शासनाकडे न्याय मागितला आहे. असे उमेश पाटील यांचे म्हणणे आहे.

  याबाबत माहीती आशी की,  गरोदर माता आणि बालकांना महीलाबाल कल्याण विभागाकडून देण्यात येणाऱ्या पोषण अहारात अनियमित झाल्याचा आरोप सदस्य उमेश पाटील, त्रिभूवन धाईंजे, ज्योती पाटील यांनी लावून धरला आहे. सर्वसाधारण सभेच्या आरोपा नंतर सोमवारी झालेल्या स्थायी समिती सभेत पदभार काढण्यावरुन पडसाद उमटले.

  जावेद शेख यांच्या समर्थनार्थ एक गट तर विरोधात एक गट असे चित्र सध्या दिसून येत आहे. सदस्य मदन दराडे, आनंद तानवडे यांनी पदभार काढू नका आशी मागणी केली आहे. जावेद शेख यांच्या कार्यकाळात कोणती ही अनियमिता झाली नाही. २०१२-१३ सालात अनियमिता झाली आहे. त्यामूळे जावेद शेख यांचा पदभार काढता येणार नाही. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी होवून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी आशी मागणी सदस्य दराडे, तानवडे यांनी केली आहे.

  या सर्व पार्श्वभूमीवर जावेद शेख यांनी अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांची भेट घेत सदस्यांनी केलेल्या सर्व आरोपांची उत्तरे दिली आहेत.अॅडीशनल सीईओ अर्जुन गुंढे यांच्याकडे चौकशी प्रकरण सोपविण्यात आले आहे.

  माळशिरस सभापती विरोधात जातीवाचक अपशब्द बोलणाऱ्या महीलाबाल कल्याण प्रकल्पअधिकारी विनोद लोंढे यांच्यावर सक्तीच्या रजेची कारवाई करण्यात आल्याचे सीईओ दिलीप स्वामी सांगत आहेत मात्र प्रत्यक्षात लोंढे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात आली नसल्याचे सदस्य धाईंजे यांचे म्हणणे आहे.

  भ्रष्ट कारभाराला जि.प.अध्यक्ष पाठबळ देत आहेत , सभागृहात जावेद शेख यांचा पदभार काढण्याचा ठराव सर्वानमते मंजूर होतो. या ठरावाची अंमलबजावणी करण्याऐवजी ठरावाच्या विरोधातील भूमिका अध्यक्ष यांनी घेतल्याने सभागृहाचा आवमान झाला आहे.

  ञिभूवन धाईंजे, सदस्य जि.प.
  आनंद तानवडे (सदस्य जि.प.)

  “भ्रष्टाचाराला कोणताच सदस्य पाठबळ देत नाही. पक्षविरहीत आम्ही सदस्य एक आहोत. सभागृहात अनेक विभाग प्रमूखांवर आरोप करण्यात आले आहेत. शेख यांच्या पदभारावरून इतके वादंग करण्याची गरज नाही. चौकशी पूर्ण झाल्यावर पाहू”
  -आनंद तानवडे (सदस्य जि.प.)

  “जावेद शेख यांच्या कार्यकाळात कोणतीही अनियमिता झाली नाही . २०१२-१३ सालातील हे प्रकरण आहे. त्यामूळे त्यांच्यावर पदभार काढण्याची कारवाई चुकीची ठरेल”
  -मदन दराडे सदस्य, जि.प.