gopichand padalkar file pettiton

राज्य सरकारला सुप्रिम कोर्टाने आदेश देऊन मागासवर्गीय आयोगाची पुनर्स्थापना करण्यास सांगितले होते. मात्र राज्य सरकार गंभीर राहिल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओबीसींचे आरक्षण काही अंशी वृद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे या समाजावर अन्याय होत आहे. काँग्रेस आणि त्यांचे मंत्री या विषयावर राजीनामा देऊ, असे म्हणत होते. मात्र त्यांनी आपले राजीनामे अजून खिशातच ठेवले आहेत. या काँग्रेसचे काका-पुतण्याच्या राजकारणासमोर काही चालत नाही. राष्ट्रवादी तर ओबीसींच्या विरोधातच आहे.

    पंढरपूर : सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारने आयोग नेमण्याचे ठरवल्याने धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पंढरपुरातील पंढरपुरातून घोंगडी बैठकांचे नियोजन केले असून यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोवीडमुळे अठरापगड जातींवर आज उपासमारीची वेळ आली आहे. हे राज्य सरकार ओबीसींच्या प्रश्नावर गंभीर नसल्याने सर्व दोनशे जमातींना या प्रश्नावर जागे करण्यासाठी आजपासून राज्यात घोंगडी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस पक्ष काका-पुतण्यांच्या राजकारणा समोर नतमस्तक झाला आहे.

    ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारला सुप्रिम कोर्टाने आदेश देऊन मागासवर्गीय आयोगाची पुनर्स्थापना करण्यास सांगितले होते. मात्र राज्य सरकार गंभीर राहिल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओबीसींचे आरक्षण काही अंशी वृद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे या समाजावर अन्याय होत आहे. काँग्रेस आणि त्यांचे मंत्री या विषयावर राजीनामा देऊ, असे म्हणत होते. मात्र त्यांनी आपले राजीनामे अजून खिशातच ठेवले आहेत. या काँग्रेसचे काका-पुतण्याच्या राजकारणासमोर काही चालत नाही. राष्ट्रवादी तर ओबीसींच्या विरोधातच आहे. आता काँग्रेस देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालले आहे, त्यामुळे यापुढील काळात मोहोळ, जामखेड, बीड, जेजुरी, या भागातून पुढे राज्यभर ओबीसींच्या आरक्षणाचा लढा देण्यासाठी मी पक्षाची आवरणे बाजूला ठेवून ओबीसींच्या लढ्यासाठी दौरे आखले आहेत. त्याची सुरुवात आज दिनांक १५ रोजी पंढरपूर येथून केली आहे.