काँग्रेसने वडेट्टीवारांवर कारवाई करावी अन्यथा मराठा समाज काँग्रेसला महाराष्ट्रातून हद्दपार करणार…

सकल मराठा समाजाकडून पत्रकार परिषद घेत आज मंत्री विजय वडेट्टीवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा मराठा समाज काँग्रेसला महाराष्ट्रातून हद्दपार करेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

    सोलापुरात काही दिवसांपूर्वी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात ‘ओबीसी निर्धार मेळावा’ पार पडला. यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली होती. त्याचे पडसाद आज सोलापुरात उमटताना पहायला मिळत आहे.