सोलापूर जिल्हयात ३० हजार घरकूलांची बांधणी पूर्ण ; ६५ हजार घरकूलांना मंजूरी

४६ हजार लाभार्थ्यांना पहिला हफ्ता जारी

  शेखर गोतसुर्वे , सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणे मार्फत जिल्हयात ३० हजार ६७२ घरकुलांची बांधणी पुर्ण करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्यशासन पुरुस्कृत योजनेंचा यामध्ये समावेश आहे. प्रधानमंत्री, रमाई, शबरी आवास योजनेतुन ६५ हजार घरकूलांना मंजूरी देण्यात आली आहे. ४६ हजार लाभार्थ्य।ना पहीला हप्ता जारी करण्यात आला आहे.

  प्रधानमंत्री आवास योजनेतून ४७ हजार प्राप्त उद्दिष्ठ्यांपैकी ३६ हजार ३२२ घरकूलांना मंजूरी देण्यात आली आहे. यातील उर्वरीत १० हजार ७३६ लाभार्थी पैकी ७ हजार ४४९६ लाभार्थ्यांकडे जागा उपलबध्द नाही. त्यांच्यासाठी पंडीत दिन दयाल योजनेतून जागा खरेदी करण्याचे कामकाज सुरु आहे.या योजनेतील ३२ हजार १३१ लाभार्थ्य।ना पहीला हप्ता देण्यात आला आहे.

  राज्य शासन पुरस्कृत योजनेतून १५ हजार ४०० घरकूलांचे उध्दीष्ट देण्यात आले होते. यापैकी १५ हजार १८० लाभार्थ्यांना मंजूरी देण्यात आली आहे.यातील १४ हजार ५२० लाभार्थ्य।ना पहीला हप्ता जारी करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या महाआवास योजनेतून १३ हजार ५६० प्रस्तावाना मंजूरी देण्यात आली आहे.

  सोलापूर जिल्हा परिषदेनी राज्यात आदर्श निर्माण केला आहे. विविध योजनांची सांगड घालून घरकूल लाभार्थ्य।ना देण्यात येणार आहे. उज्वला गॅस योजनेतून गॅस क्नेक्शन,सौभाग्य योजनेतून वीज कनेक्शन, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंर्तगत शौचालय, जलजीवन मिशन योजनेतून नळ क्नेक्शन आशा विविध जि.प.च्या योजना देण्यात आहे. यासह उमेद अभियानातील एमएसआरएलएम बचत गटातील महीला सदस्यांना लाभ देण्यात आला आहे.

   

  घरकूला सोबत विविध योजना घरकूल लाभार्थ्यांना विविध योजना जि.प.च्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. गॅस, शौचाल, वीज, नळक्नेशन योजनांचा समावेश आहे.

  दिलीप स्वामी, मुख्यकार्यकारीअधिकारी,जि.प.

  “जिल्हयातील घरकूल कामकाज प्रगतीपथावर आहे. जिल्हयात ३० हजार घरकूल बांधणी पूर्ण झाली आहे. अनेक लाभार्थ्यांना पहीला हप्ता देण्यात आला आहे.”

  -डॉ.अर्जुन गुंढे , प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा